तुमची Google Play Points पातळी आणि फायदे कसे तपासायचे

तुम्ही वर्षभर पॉइंट मिळवता तेव्हा तुम्हाला विशिष्ट पातळीवर नेण्यासाठी तुमचे पॉइंट जोडले जातात. तुम्ही जितके पॉइंट मिळवता तितक्याच वरच्या पातळीवर पोहोचता. तुमची पातळी जितकी वर असेल तितके तुम्ही जास्त पॉइंट, लाभ आणि फायदे मिळवू शकता.

Play Points ची उपलब्धता, अवॉर्डच्या पातळ्या आणि मल्टीप्लायरचे दर देशानुसार वेगवेगळे असतात. Play Points सर्व देशांमध्ये उपलब्ध नाही.

Google Play Points आणि पातळीनुसार फायदे

पातळी तुमच्याकडे # पॉइंट
असणे आवश्यक आहे
प्रत्येक €१ च्या खर्चासाठी
पॉइंट मिळवले
अतिरिक्त फायदे
ब्रॉंझ ० - १४९ १ पॉइंट
  • गेममधील पॉइंट इव्‍हेंट
  • मल्टीप्लायर बुक करा
सिल्व्हर १५० - ५९९ १.१ पॉइंट
  • गेममधील पॉइंट इव्‍हेंट
  • मल्टीप्लायर बुक करा
  • सा��्ताहिक सिल्व्हर बक्षिसे
गोल्ड ६०० - २,९९९ १.२ पॉइंट
  • गेममधील पॉइंट इव्‍हेंट
  • मल्टीप्लायर बुक करा
  • साप्ताहिक गोल्ड बक्षिसे
प्लॅटिनम ३००० - ९,९९९ १.४ पॉइंट
  • गेममधील पॉइंट इव्‍हेंट
  • मल्टीप्लायर बुक करा
  • साप्ताहिक प्लॅटिनम बक्षिसे
  • प्रीमियम सपोर्ट
डायमंड १०,००० पेक्षा जास्त किंवा त्यासमान १.६ पॉइंट
  • गेममधील पॉइंट इव्‍हेंट
  • मल्टीप्लायर बुक करा
  • साप्ताहिक डायमंड बक्षिसे
  • प्रीमियम सपोर्ट

तुमची Google Play Points पातळी कशी तपासायची

तुमच्याकडे किती Google Play Points आहेत, तुम्हाला पुढील पातळीवर जाण्यासाठी किती पॉइंट आवश्यक आहेत, तुमचा कमाईचा मूळ दर आणि तुम्ही पुढील पातळीवर जाण्यासाठी पुरेसे पॉइंट न मिळवल्यास, तुम्ही तुमच्या सध्याच्या स्तरावर किती काळ राहाल हेदेखील तुम्ही पाहू शकाल.

तुमची पातळी कशी वाढते

तुम्ही नवीन पातळीवर पोहोचता तेव्हा पुढील वर्षापर्यंत तुम्ही त्याच पातळीवर राहता. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला, तुम्ही मागील वर्षात किती पॉइंट मिळवले यानुसार तुमची पातळी बदलू शकते.

२०२१ ते २०२२ यादरम्यान तुमची पातळी कशी बदलू शकते याचे उदाहरण येथे दिले आहे:

  • १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या एका वर्षात तुम्ही गोल्ड पातळीवर पोहोचता. तुम्ही कोणतेही पॉइंट मिळवले नसले तरीही पुढील वर्षापर्यंत (३१ डिसेंबर २०२२) तुम्ही गोल्ड स्टेटसमध्ये राहाल.
  • १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ यादरम्यान, तुम्ही इतके पॉइंट मिळवल्यास:
    • तुम्ही १५० पॉइंट मिळवल्यास, तुम्ही १ जानेवारी २०२३ पासून सिल्व्हर पातळीवर सुरुवात कराल. 
    • तुम्ही ६०० पॉइंट मिळवल्यास, तुम्ही १ जानेवारी २०२३ पासून गोल्ड पातळीवर सुरुवात कराल.
    • तुम्ही ३००० पॉइंट मिळवल्यास, तुम्ही १ जानेवारी २०२३ पासून प्लॅटिनम पातळीवर सुरुवात कराल.

प्लॅटिनम किंवा डायमंड स्टेटस Play Points वापरकर्त्यांसाठी प्रीमियम सपोर्ट

Google Play Points मध्ये तुमच्याकडे प्लॅटिनम किंवा डायमंड स्टेटस असल्यास, तुम्हाला अतिरिक्त सपोर्ट फायदे मिळू शकतात. प्लॅटिनम किंवा डायमंड स्टेटस कसे मिळवावे हे जाणून घ्या.

  • Play शी संबंधित समस्यांसाठी प्रतीक्षा सूची पहा. तुम्ही आमच्या सपोर्ट टीमला कॉल करता किंवा चॅट करता तेव्हा, तुम्हाला आपोआप प्राधान्य दिले जाते आणि तुम्हाला कमी वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. 
  • समर्पित सपोर्ट टीममधील तज्ञाशी चॅट करा. तुमच्याकडे प्लॅटिनम किंवा डायमंड स्टेटस असल्यास, प्लॅटिनम किंवा डायमंड स्टेटस असणाऱ्या वापरकर्त्यांना सपोर्ट करण्यासाठी असलेल्या समर्पित टीममधील विशेष निवडलेल्या एजंटसोबत तुम्हाला लगेच जोडले जाईल.

टीप: Google Play हे प्रतीक्षा वेळांची हमी देऊ शकत नाही. सर्व सपोर्ट फायदे हे उपलब्धतेच्या अधीन आहेत.

 

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
15019732616758415489
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false