Google Play Store मध्ये पॉइंट वापरणे

तुम्ही खालील गोष्टी मिळवण्यासाठी पॉइंट वापरू शकता:
  • अ‍ॅपमधील किंवा गेममधील आयटम
  • सवलतीच्या किमतीमध्ये अ‍ॅपमधील किंवा गेममधील आयटम खरेदी करण्यासाठी कूपन
  • Google Play क्रेडिट
  • भागीदार रिवॉर्ड

पॉइंट वापरा

टीप: आयटम निकामी केला गेला असल्यास, तुमच्याकडे तो आयटम मिळवण्यासाठी कदाचित पुरेसे पॉइंट नसतील. तुमच्याकडे किती पॉइंट आहेत ते तपासा.

  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. Play पॉइंट आणि त्यानंतर वापरा वर टॅप करा.
  4. आयटम, कूपन, Play क्रेडिट निवडा किंवा चांगल्या कामासाठी देणगी द्या.
  5. पॉइंट वापरा वर टॅप करा.

तुम्ही अ‍ॅपमधील किंवा गेममधील आयटम मिळवण्यासाठी अथवा चां��ल्या कामाला पाठिंबा देण्याकरिता पॉइंट वापरल्यावर तुम्हाला त्याचा परतावा मिळवू शकणार नाही.

Play Points च्या परतावा धोरणांबद्दल अधिक जाणून घ्या

तुम्ही तुमच्या पॉइंटशी एक्‍सचेंज केलेली कूपन शोधा आणि वापरा

तुम्ही कूपनच्या नियमांची पूर्तता करणारी अ‍ॅपमधील खरेदी केल्यावर, तुमची सवलत आपोआप लागू होते. पॉइंट रिडीम करून घेतलेली कोणतीही कूपन एका वर्षाने एक्स्पायर होतात.

  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  3. Play Points वर टॅप करा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर पॉइंटचा इतिहास वर टॅप करा.
तुम्ही तुमच्या पॉइंटशी एक्‍सचेंज केलेले अ‍ॅपमधील किंवा गेममधील आयटम शोधा आणि वापरा
तुम्ही तुमच्या पॉइंटशी एक्‍सचेंज केलेला आयटम शोधण्यासाठी अ‍ॅप किंवा गेम उघडा.
Google Play क्रेडिट साठी पॉइंट वापरा
तुम्ही पॉइंट रिडीम करून घेतलेले कोणतेही Google Play क्रेडिट एका वर्षाने एक्स्पायर होते. Google Play क्रेडिट वापरून काय खरेदी करता येते ते जाणून घ्या.
चेकआउट करताना ऑर्डरसाठी पॉइंट वापरणे
पात्र देशांच्या बाबतीत, तुम्ही काही पॉइंट रिवॉर्ड तुमच्या ऑर्डरवर लागू करून, खरेदी पूर्ण करण्यासाठी दुसरी पेमेंट पद्धत वापरू शकता. तुम्ही हे चेकआउटच्या टप्प्यावर करू शकता. व्यवहार सुरू झाल्यावर पॉइंट वजा केले जातात. व्यवहार पूर्ण न झाल्यास, वापरलेल्या पेमेंट पद्धतीनुसार १-७ दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पॉइंट रिटर्न केले जातील.
तृतीय पक्ष व्हाउचरसाठी पॉइंट वापरणे
तुम्ही तृतीय पक्ष व्हाउचरसाठी तुमचे Play पॉइंट एक्स्चेंज करता, तेव्हा ते तुमच्या लाभांसंबंधित टॅबमध्ये सेव्ह केले जाते.
  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. Play Points वर टॅप करा.
  4. लाभ वर टॅप करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
12493532442691308175
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false