तुमचे Google Play पॉइंट मिळवणे आणि त्यांचा माग ठेवणे

तुम्ही सामील झाल्यानंतर, तुमच्या नोंदणी केलेल्या Google खाते मधून केलेल्या Google Play खरेदीसाठी तुम्हाला पॉइंट मिळतील. तुम्ही Google Play Points मध्ये सामील होण्याआधी केलेल्या खरेदीसाठी तुम्हाला पॉइंट मिळणार नाहीत. 

Play Points ची उपलब्धता, अवॉर्डच्या पातळ्या आणि मल्टीप्लायरचे दर देशानुसार वेगवेगळे असतात. Play Points सर्व देशांमध्ये उपलब्ध नाही.

पॉइंट कसे मिळवायचे

  • Play Store वरून अ‍ॅप्स किंवा गेम खरेदी करा
  • Android वरून Google One चे सदस्यत्व घ्या
  • अ‍ॅपमधील किंवा गेममधील खरेदी करा आणि सदस्यत्वे घ्या
  • Google Play वापरून पुस्तके खरेदी करा
    • महत्त्वाचे: पुस्तकांसाठीचे Play क्रेडिट ऑस्ट्रिया, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, इस्राएल किंवा स्पेनमध्ये रिडीम केले जाऊ शकत नाही.
तुम्ही कोणता आशय विकत घेऊ शकता आणि पॉइंट मिळवू शकता हे तुमच्या देशावर अवलंबून असते.

पॉइंटबद्दल जाणून घेण्याच्या गोष्टी

  • तुम्ही तुमचे Android डिव्हाइस, काँप्युटर आणि स्मार्ट टीव्ही यांवर केलेल्या Google Play खरेदीवर पॉइंट मिळवू शकता.
  • तुम्ही पॉइंट खरेदी करू शकत नाही किंवा पॉइंट रोख रकमेत रूपांतरित करू शकत नाही.
  • तुम्ही खात्यांदरम्यान किंवा इतर एखादी व्यक्ती तुमच्या कुटुंब गटाचा भाग असली तरीही, तिला पॉइंट ट्रान्सफर करू शकत नाही.
  • तुमच्याकडे Google Play पॉइंट असल्यास आणि तुम्ही तुमच��� बिलिंग देश बदलल्यास, तुमचे पॉइंट गमवले जातील व तुमची पातळी नवीन बिलिंग देशामध्ये लागू केली जात नाही.
 

पॉइंट कसे मोजले जातात

मिळालेले पॉइंट मोजण्यासाठी, आयटमच्या किमतीला तुमच्या पातळीसाठी असलेल्या कमाईच्या मूळ दराने गुणा. तुम्हाला मिळणार असलेल्या पॉइंटची संख्या जास्त किंवा कमी करून सर्वात जवळची पूर्णांक संख्या केली जाते. लागू असलेल्या प्रदेशावर आधारित तुम्ही विशिष्ट रकमेपेक्षा कमी कमाई केल्यास, तुम्ही शून्य पॉइंट मिळवू शकता. 

दिलेल्या कोणत्याही करांचा समावेश न करता, तुम्हाला फक्त आयटमच्या किमतीसाठी पॉइंट मिळतील.

उदाहरणार्थ:

ब्राँझ पातळीवर, तुम्हाला सर्व खरेदीवर प्रति $१ USD साठी एक पॉइंट मिळतो. तुम्ही $५ USD खर्च केल्यास, तुम्हाला पाच पॉइंट मिळतात. 

  • तुम्ही सिल्व्हर पातळीवर पोहोचल्यावर, तुम्हाला प्रति $१ USD साठी १.१० पॉइंट मिळतात. तुम्ही $५ USD खर्च केल्यास, तुम्हाला ५.५० वरून जवळची पूर्णांक संख्या केलेले सहा पॉइंट मिळतात.
टीप: प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला, तुम्ही मागील वर्षी किती पॉइंट मिळवले त्यानुसार तुमची पातळी बदलू शकते. तुमची पातळी जितकी वरची असेल, तितके तुम्ही सर्व खरेदीवर प्रति $१ USD साठी जास्त पॉइंट मिळवता. पातळी बदलांविषयी अधिक जाणून घ्या.

तुमचे पॉइंट कशामध्ये मोजले जातात

मिळवलेले पॉइंट Play Points शिल्लक आणि पातळीची प्रगती या दोन्हींमध्ये मोजले जातात.

  • Play Points शिल्लक: हे पॉइंट अ‍ॅप्स आणि गेममधील खास आयटम अनलॉक करण्यासाठी वापरा किंवा त्यांच्या मोबदल्यात Google Play क्रेडिट मिळवा. तुम्ही पॉइंट वापरल्यावर किंवा बदलून घेतल्यावर, या शिलकीमधून पॉइंट कापले जातील. तुम्ही मिळवलेले कोणतेही प���इंट तुम्ही शेवटच्या वेळी मिळवलेल्या किंवा वापरलेल्या पॉइंटनंतर एका वर्षाने एक्स्पायर होतील.
  • पातळीची प्रगती: तुम्ही एका वर्षामध्ये मिळवलेले पॉइंट पुढील पातळीमध्ये प्रगती म्हणून मोजले जातात. तुम्ही पॉइंट वापरल्यावर ते तुमच्या पातळीच्या प्रगतीमधून कापले जाणार नाहीत. तुम्ही एखाद्या पातळीवर पोहोचल्यावर, पुढील वर्ष संपेपर्यंत त्याच पातळीवर राहता.

तुम्ही ज्यावर पॉइंट मिळवले आहेत अशी खरेदी रिटर्न करता किंवा रद्द करता तेव्हा, ते पॉइंट तुमच्या Play Points शिलकीमधून आणि पातळीच्या प्रगतीमधून कापले जातील.

तुमचे पॉइंट आणि ते कधी एक्स्पायर होतात ते पहा

प्रचारांद्वारे अतिरिक्त पॉइंट मिळवा

काही प्रचारांमुळे निवडक खरेदीवर तुमचा कमाईचा दर वाढेल. नमूद केलेल्या कालावधीदरम्यान तुम्ही उपलब्ध असलेल्या सर्वोच्च कमाईच्या दराने पॉइंट मिळवू शकता.

  • एकाच खरेदीवर एकाहून अधिक प्रचार एकत्रित केले जाऊ शकत नाहीत.
  • प्रचारांमध्ये ते लागू करत असलेला, सेट केलेला कमाईचा दर असतो.
  • प्रचार आणि त्यांच्या एक्स्पायरीच्या तारखा वेगवेगळ��या असू शकतात.
  • काही प्रचारांसाठी अ‍ॅक्टिव्हेशनची आवश्यकता असू शकते.
  • काही प्रचारांना एक्स्पायरीची तारीख असू शकते. तुम्ही तुमची खरेदी एक्स्पायरीच्या तारखेनंतर केल्यास, तुम्हाला तुमच्या पातळीसाठी नियमित दराने पॉइंट मिळतात.
  • काही प्रमोशन ही निवडक सहभागींसाठी त्यांच्या खरेदी इतिहासाच्या किंवा Google Play Store ॲपशी साधलेल्या संवादांच्या आधारे खुली असतात.
  • एकाहून अधिक खरेदीची प्रमोशन विशिष्ट चलनासाठी असतात. पात्र ठरण्यासाठी, खरेदी ही प्रमोशनच्या चलनामध्येच केली जाणे आवश्यक आहे.
    • उदाहरण: एकाहून अधिक खरेदीच्या प्रचारानुसार, "१०० पाॅइंट मिळवण्यासाठी, $०.९९ USD किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पाच खरेदी करा." या प्रचारासाठी फक्त USD मध्ये केलेली खरेदी पात्र आहे.
  • अ‍ॅप किंवा गेम इंस्टॉलच्या प्रमोशनसाठी, ते पहिल्यांदा इंस्टॉल करणे आवश्यक आहे. पॉइंट ठेवण्यासाठी तुम्ही अ‍ॅप किंवा गेम डाउनलोड करून तुमच्या फोनवर एक दिवस ठेवणे आवश्यक आहे. तसे न केल्यास, पॉइंट काढून टाकले जातील.

सदस्यत्वे:

  • तुम्ही अ‍ॅपद्वारे सदस्यत्व खरेदी केल्यास, तुम्हाला तुमच्या पातळीसाठी नियमित दराने पॉइंट मिळतात.
  • काही प्रचार पहिल्यांदा सदस्य होणाऱ्यांसाठी निवडक अ‍ॅप्स आणि गेममध्ये अतिरिक्त पॉइंट देऊ शकतात.
  • एखाद्या अ‍ॅप किंवा गेमचे पहिल्यांदा सदस्य होण्यासाठी तुम्हाला कमाल फक्त एका वेळेचा पॉइंट बोनस मिळू शकतो.
  • तुम्हाला बिल केले जाते तेव्हा, अ‍ॅप्स आणि गेममधील निवडक सदस्यत्वे अतिरिक्त पॉइंट देऊ शकतात.
  • फक्त Google Play द्वारे केलेल्या खरेदीवर पॉइंट मिळवले जाऊ शकतात.

तुमचे प्रचार पहा

  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. Play पॉइंट आणि त्यानंतर मिळवा वर टॅप करा.
    • सर्वात वरती तुमचा मूळ पातळीचा कमाईचा दर आहे.
    • तळाशी जाहिराती आणि त्यांच्या खास ऑफरची सूची आहे.

कमाईच्या विशेष दरासह पॉइंट कसे मोजले जातात त्याचे हे उदाहरण आहे:

जॉन सिल्व्हर पातळीवर आहे आणि सर्व खरेदीसाठी त्याचा कमाईचा मूळ दर प्रति $१ USD साठी १.१० पॉइंट इतका आहे.
त्याला विशिष्ट गेमकडून प्रति $१ USD साठी तीन पॉइंट मिळवण्याची खास ऑफर मिळते. खास ऑफर हा जॉनच्या कमाईच्या मूळ दरापेक्षा चांगला कमाईचा दर असल्यामुळे, त्याला त्या गेममध्ये खरेदीसाठी खास ऑफर दर मिळेल.
त्याने खास ऑफरच्या कालावधीदरम्यान त्या गेममध्ये $१ USD खर्च केल्यावर, त्या खरेदीसाठी त्याला तीन पॉइंट मिळतात.

साप्ताहिक बक्षिसे रिडीम करा

तुम्ही Play Points मध्ये सिल्व्हर किंवा त्यापेक्षा वरच्या पातळीवर असल्यास, तुमच्या साप्ताहिक बक्षिसावर दावा करून तुम्हाला रिवॉर्ड मिळवता येतील.

महत्त्वाचे: तुमच्या Play देशामध्ये साप्ताहिक बक्षिसे शुक्रवारी रीसेट होतात.

  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. Play पॉइंट आणि त्यानंतर लाभ वर टॅप करा.
    • ��ुमच्या बक्षिसावर दावा करण्यासाठी: उघडा आणि त्यानंतर तुमचे साप्ताहिक बक्षीस यावर दावा करा वर टॅप करा. 
    • तुम्ही तुमचे साप्ताहिक बक्षीस आधीच रिडीम केले आहे का हे पाहण्यासाठी: आणखी More आणि त्यानंतर पॉइंट इतिहास वर टॅप करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
12515105104096724048
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false