जागा मोकळी करणे

आणखी ॲप्स आणि मीडिया डाउनलोड करण्यासाठी किंवा तुमचा फोन आणखी चांगल्या प्रकारे चालण्यात मदत व्हावी यासाठी, तुम्ही तुमच्या फोनवरील जागा साफ करू शकता.

  • तुम्ही संगीत आणि फोटो यांसारखा डेटा जेथे ठेवता ते म्हणजे स्टोरेज.
  • तुम्ही ॲप्स आणि Android सिस्टीम यांसारखे प्रोग्राम जेथे ठेवता ती म्हणजे मेमरी.

महत्त्वाचे: यां��ैकी काही पायर्‍या फक्त Android 9 आणि त्यावरील आवृत्त्यांवर काम करतात. तुमची Android आवृत्ती कशी तपासायची ते जाणून घ्या.

स्टोरेज मोकळे करा

फोटो काढून टाका
तुम्ही Google Photos वापरून बॅकअप घेतल्यास, तुम्ही तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरील प्रती हटवू शकता. तुमचे डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्ट केलेले असेल, तेव्हा तुम्ही अ‍ॅपमध्ये बॅकअप घेतलेल्या प्रती शोधू शकता. तुमच्या डिव्हाइसमधून फोटो आणि व्हिडिओ कसे हटवायचे ते जाणून घ्या.
डाउनलोड केलेले चित्रपट, संगीत आणि इतर मीडिया काढून टाका

Google Play मधून आशय हटवण्यासाठी:

  1. आशय असलेले Play Music किंवा Play चित्रपट आणि टीव्ही यांसारखे Google Play ॲप उघडा.
  2. मेनू मेनूआणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर डाउनलोड व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. डाउनलोड केलेले Downloadedआणि त्यानंतर काढून टाका वर टॅप करा.

इतर स्रोतांमधील आशय हटवण्यासाठी, तुम्ही तो डाउनलोड करण्यासाठी जे ॲप वापरले, त्यामधून तो हटवा.

ॲप्स आणि अ‍ॅप डेटा काढून टाका

प्रतिसाद न देणारी ॲप्स बंद करा

सामान्यतः तुम्हाला अ‍ॅप्स बंद करावी लागत नाहीत. मात्र एखादे ॲप ���्रतिसाद देत नसल्यास, तुम्ही ते अ‍ॅप बंद करण्याचा किंवा सक्तीने थांबवण्याचा प्रयत्न करू शकता. काम न करणारी ॲप्स ट्रबलशूट कशी करायची ते जाणून घ्या.

तुम्ही वापर करत नसलेली ॲप्स अनइंस्टॉल करा

एखादे ॲप अनइंस्टॉल केल्यास आणि तुम्हाला ते नंतर आवश्यक असल्यास, तुम्ही ते पुन्हा डाउनलोड करू शकता. तुम्ही त्या अ‍ॅपसाठी पैसे दिले असल्यास, तुम्हाला ते खरेदी करावे लागत नाही. अ‍ॅप्स कशी अनइंस्टॉल करावीत ते जाणून घ्या.

ॲपची कॅशे आणि डेटा साफ करा

तुम्ही सामान्यतः तुमच्या फोनच्या Settings अ‍ॅपमधून अ‍ॅपची कॅशे आणि डेटा साफ करू शकता. सेटिंग्ज फोननुसार बदलू शकतात. अधिक माहितीसाठी, तुमच्या डिव्हाइसच्या उत्पादकाकडून मदत मिळवणे हे करा.

  • कॅशे साफ करा: तात्पुरता डेटा हटवते. काही अ‍ॅप्स तुम्ही पुढच्या वेळेस उघडाल तेव्हा ती धीमी असू शकतील.
  • डेटा स्टोरेज साफ करा: सर्व ॲप डेटा कायमचा हटवते. प्रथम अ‍ॅपमधील डेटा हटवण्याचा प्रयत्न करा.
जागा मोकळी करण्यासाठी अ‍ॅप्स आपोआप संग्रहित करणे

नवीन अ‍ॅप्ससाठी जागा मोकळी करण्याकरिता, तुमचे डिव्हाइस तुम्ही वारंवार वापरत नसलेली अ‍ॅप्स आपोआप संग्रहित करू शकते. हे सेटिंग सुरू असताना, तुम्ही वारंवार वापरत नसलेली अ‍ॅप्स काढून टाकली जातील, पण अ‍ॅपवरील तुमचा वैयक्तिक डेटा सेव्ह केला जाईल. अ‍ॅपचा आयकन तुमच्या डिव्हाइसवरच राहील. अ‍ॅप हे Google Play वर उपलब्ध असेपर्यंत, तुम्हाला ते पुन्हा डाउनलोड करता येईल.

तुम्ही एखादे अ‍ॅप इंस्टॉल करण्याचा प्रयत्न केल्यास, पण तुमच्याकडे पुरेशी जागा नसल्यास, तुम्हाला अ‍ॅप्स आपोआप संग्रहित करण्याबद्दल सूचित केले जाते. तुमचे डिव्हाइस अ‍ॅप्स आपोआप कसे संग्रहित करते ते सेट करण्यासाठी:

  1. Play Store ॲप उघडा.
  2. सेटिंग्जआणि त्यानंतर सर्वसाधारण वर जा.
  3. अ‍ॅप्स आपोआप संग्रहित करा सुरू किंवा बंद करा.
फाइल हटवा किंवा हलवा

डाउनलोड केलेल्या फाइल हटवा

डाउनलोड केलेल्या फाइल कशा शोधायच्या आणि काढून टाकायच्या ते जाणून घेण्यासाठी, तुमच्या डिव्हाइस उत्पादकाच्या सपोर्ट साइटवर जाणे हे करा.

कॉंप्युटरवर फाइल कॉपी करा

तुम्ही USB केबल वापरून फाइल आणि फोल्डर कॉंप्युटरमध्ये हलवू शकता आणि त्यानंतर ती तुमच्या फोनमधून हटवू शकता. तुमचा फोन आणि कॉंप्युटरदरम्यान फाइल कशा ट्रान्सफर करायच्या ते जाणून घ्या.

तपासा आणि मेमरी मोकळी करा

सामान्यतः तुम्हाला अ‍ॅप्स बंद करावी लागत नाहीत. मात्र एखादे ॲप प्रतिसाद देत नसल्यास, तुम्ही ते अ‍ॅप बंद करण्याचा किंवा सक्तीने थांबवण्याचा प्रयत्न करू शकता. काम न करणारी ॲप्स ट्रबलशूट कशी करायची ते जाणून घ्या.

टीप: एखादे ॲप खूप जास्त मेमरी वापरत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही ते ॲप हटवू शकता. अ‍ॅप्स कशी अनइंस्टॉल करावीत ते जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
16683504264234733836
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false