Google Play इंस्टंट सुरू किंवा बंद कसे करावे

तुमचे डिव्हाइस हे इंस्टंट अ‍ॅप्स किंवा वेबसाइटमध्ये लिंक कसे उघडते ते तुमच्या सेटिंग्जमध्ये तुम्ही बदलू शकता. तुम्ही “वेब लिंक अपग्रेड करा” सुरू करून, ठरावीक लिंकवर क्लिक केल्यास, इंस्टंट अ‍ॅप उघडू शकते आणि तुम्ही प्रत्यक्षात पूर्ण अ‍ॅप इंस्टॉल न करता त्याची काही वैशिष्ट्ये वापरू शकाल. सेटिंग बंद केले असल्यास, लिंक वेबसाइटमध्ये उघडेल. इंस्टंट अ‍ॅप्सबद्दल अधिक जाणून घ्या.

  1. Google Play अ‍ॅप Google Play उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर साधारण आणि त्यानंतर Google Play इंस्टंट वर टॅप करा.
  4. वेब लिंक अपग्रेड करा हे सुरू किंवा बंद करा.

टीप: Google Play इंस्टंट तुमच्या सेटिंग्जमध्ये नसल्यास, ते कदाचित तुमच्या डिव्हाइस प्रकारासाठी उपलब्ध नसेल.

इंस्टंट अ‍ॅप्सबद्दल अधिक जाणून घ्या

तुम्ही अ‍ॅपच्या लिंकवर (शोध, ईमेल किंवा जाहिराती आणि बऱ्याच गोष्टींवर) क्लिक करता तेव्हा, काही अ‍ॅप्स Google Play इंस्टंटसह उघडू शकतात आणि तुम्हाला ती इंस्टॉल करण्यापूर्वी वापरू देऊ शकतात. “इंस्टंट अ‍ॅप्स,” नावाची ही अ‍ॅप्स तुम्हाला अ‍ॅप इंस्टॉल केल्याशिवाय त्याची काही वैशिष्ट्ये वापरू देतात.

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
6464400280959350471
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false