Google Play इंस्टंट शी संबंधित समस्यांचे निराकरण कसे करावे

टीप: Android Instant Apps is currently only available on some devices.

तुम्ही खालील सूचना वापरून इंस्टंट अ‍ॅप्सच्या समस्यांसाठी उपाय शोधू शकता. तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर इंस्टॉल केलेल्या अ‍ॅपशी संबंधित समस्या येत असल्यास, मदत शोधण्यासाठी, पेजच्या सर्वात वरती असलेल्या बॉक्समध्ये "Google Play मदत केंद्र यामध्ये शोधा" असे लिहिले आहे तेथे तुमच्या समस्येचे वर्णन करा.

तुम्हाला येत असलेली समस्या निवडा

मला इंस्टंट अ‍ॅपची सेटिंग्ज बदलायची आहेत

Google Play इंस्टंट सुरू किंवा बंद करणे

  1. Google Play अ‍ॅप Google Play उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर साधारण आणि त्यानंतर Google Play इंस्टंट वर टॅप करा.
  4. Google Play इंस्टंट सुरू किंवा बंद करा.

एखाद्या विशिष्ट इंस्टंट अ‍ॅपचा डेटा साफ करा

तुम्ही वापरलेल्या एखाद्या इंस्टंट अ‍ॅपचा डेटा तुम्ही साफ करू शकता:

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Settings अ‍ॅप सेटिंग्ज उघडा.
  2. अ‍ॅप्स आणि सूचना वर टॅप करा, ज्यामुळे सर्वात वर अलीकडे उघडलेली अ‍ॅप्स दिसतील.
  3. तुम्हाला ज्याचे सेटिंग बदलायचे आहे त्या इंस्टंट अ‍ॅपवर टॅप करा.
  4. अ‍ॅप साफ करा वर टॅप करा. 

टीप: तुम्ही तुमच्या Google खाते शी कनेक्ट केलेली अ‍ॅप्स व्यवस्थापित करण्यासाठी तुमच्या खाते पेजवर जाणे हेदेखील करू शकता. लक्षात घ्या, की तुम्ही डेव्हलपरसोबत शेअर केलेली सर्व माहिती ही डेव्हलपरच्या गोपनीयता धोरणाच्या अधीन असल्यामुळे, तुम्हाला ही माहिती व्यवस्थापित करायची असल्यास, डेव्हलपरशी संपर्क साधा.

एखादे इंस्टंट अ‍ॅप काम करणे थांबते, क्रॅश होते किंवा लोड होत नाही

तुमचे वेब कनेक्शन तपासा

तुमच्याकडे अ‍ॅक्टिव्ह आणि काम करत असलेले वायफाय किंवा मोबाइल डेटा कनेक्शन असल्याचे तपासा. असे करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे वेबवर शोधणे. Google वर मांजरी शोधण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला मांजरींविषयी माहिती दिसल्यास, कदाचित तुमच्या इंटरनेट कनेक्शनशी संबंधित समस्या ��ाही. 

शोधाचे परिणाम न मिळाल्यास, कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या असू शकते. तुमच्या कनेक्टिव्हिटी समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा.

अ‍ॅप रीलोड करून पाहा

तुमचे इंटरनेट कनेक्शन काम करत असल्याचे तुम्ही कंफर्म केल्यानंतर, लिंकवर पुन्हा क्लिक करा आणि इंस्टंट अ‍ॅप व्यवस्थित लोड होते का हे पाहा. 

त्याऐवजी वेब वापरा

तुम्ही तुमचे कनेक्शन तपासून अ‍ॅप रीलोड करून पाहिले असल्यास आणि तरीही ते काम करत नसल्यास, तुम्ही वेब ब्राउझर (जसे की, Chrome किंवा Firefox) वापरून तुमचा आशय मिळवू शकता

मला इंस्टंट अ‍ॅपमधील एखाद्या गोष्टीसाठी पैसे भरताना समस्या येत आहे

तुमचे पेमेंट पूर्ण होणार नाही

तुम्हाला इंस्टंट अ‍ॅपमधील एखाद्या गोष्टीसाठी पैसे भरताना समस्या येत असल्यास, पेमेंटशी संबंधित सामान्य समस्यांची ही निराकरणे वापरून पाहाणे हे करा . 

मला दुसरी पेमेंट पद्धत / पर्याय वापरायचा आहे

इंस्टंट अ‍ॅप्समध्ये पेमेंटचे सर्व पर्याय उपलब्ध असतीलच असे नाही. तुम्ही चेक आउट करता तेव्हा, सूचीबद्ध न केलेली पेमेंट पद्धत तुम्हाला वापरायची असल्यास, तुमच्या डिव्हाइसवर अ‍ॅप इंस्टॉल करणे हे करा किंवा त्याऐवजी वेब वापरा. 

अलीकडे वापरलेली इंस्टंट अ‍ॅप्स मला पाहायची आहेत

तुम्ही अलीकडे कोणती इंस्टंट अ‍ॅप्स वापरली आहेत हे तुम्ही पाहू शकता:
  1. तुमच्या डिव्हाइसवर, Settings अ‍ॅप सेटिंग्ज उघडा.
  2. "अ‍ॅप्स आणि सूचना" वर टॅप करा ज्यामुळे, अलीकडे उघडलेली अ‍ॅप्स सर्वात वरती दिसतील.
  3. कोणत्याही अ‍ॅपविषयी अधिक तपशील पाहाण्यासाठी त्यावर टॅप करा. तुमच्या फोनचा अवलोकन मेनू यामध्ये अलीकडील अ‍ॅप्सच्या सूचीमध्ये तुम्ही वापरलेली इंस्टंट अ‍ॅप्सदेखील दिसतील.
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
10668121089242566602
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false