तुमच्या लहान मुलाची Google Play ॲप्स व्यवस्थापित करणे

तुमच्या लहान मुलाचे Google खाते व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही Family Link वापरता, तेव्हा तुमचे लहान मूल ठरावीक डिव्हाइसवर वापरू शकत असलेली ॲप्स मर्यादित करणे निवडू शकता.

तुमच्या लहान मुलाची ॲप्स व्यवस्थापित करण्यासाठी, तुमचे लहान मूल पुढीलपैकी एक डिव्हाइस वापरत असणे आवश्यक आहे:

  • Android डिव्हाइस (Android 5.1 किंवा त्यावरील आवृत्ती रन करणारे)
  • Chromebook (Chrome OS 71 किंवा त्यावरील आवृत्ती रन करणारे)

महत्त्वाचे: सिस्टीम ॲपवर ॲपच्या मर्यादा घातल्या जाऊ शकत नाहीत. तुम्ही Android 7 आणि त्यावरील आवृत्ती असलेल्या डिव्हाइससाठी मर्यादा सेट करू शकता.

तुमचे लहान मूल Google Play मधील कोणती ॲप्स वापरू शकते ते निवडणे

एखादे ॲप ब्लॉक किंवा अनब्लॉक करणे

सुमारे ५ मिनिटांमध्ये किंवा डिव्हाइस इंटरनेटशी कनेक्ट केल्यावर, ॲप ब्लॉक किंवा अनब्लॉक केले जाईल. तुम्ही ॲप ब्लॉक करत असताना तुमचे लहान मूल ते वापरत असल्यास, ॲप ब्लॉक केले जाण्यापूर्वी काम संपवण्यासाठी त्यांना १ मिनिटाची चेतावणी मिळेल. तुमच्या लहान मुलाच्या सर्व Android डिव्हाइस किंवा Chromebooks वर ॲप ब्लॉक केले गेले पाहिजे.

महत्त्वाचे: काही ॲप्स ब्लॉक केली जाऊ शकत नाहीत, कारण पालक पर्यवेक्षण सेटिंग्जनी काम करण्यासाठी किंवा तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसने काम करण्यासाठी ती आवश्यक असतात.

Family Link ॲप

तुम्ही Family Link अ‍ॅपमध्ये तुमच्या लहान मुलाच्या ज्या खाते सेटिंग्जना शेवटची भेट दिली होती, त्यांवर जाण्यासाठी खालील बटणावर टॅप करा:

Family Link वर अ‍ॅप ब्लॉक किंवा अनब्लॉक करणे
  1. Family Link ॲप Family Link उघडा.
  2. तुमचे लहान मूल निवडा.
  3. नियंत्रणे आणि त्यानंतर ॲपच्या मर्यादा वर टॅप करा.
  4. तुम्हाला अनुमती द्यायचे असलेले किंवा ब्लॉक करायचे असलेले ॲप निवडा.
  5. ब्लॉक करा Block आणि त्यानंतर पूर्ण झाले वर टॅप करा.

टिपा:

  • तुमचे लहान मूल हे त्यांची खाते सेटिंग्ज स्वतः नियंत्रित करू शकते की नाही, यामुळे ती सेटिंग्ज बदलत नाहीत. पालकांनी हे नियंत्रण बदलल्यानंतर सेटिंग्ज योग्य असल्याची खात्री करावी अशी आम्ही शिफारस करतो.
  • तुम्ही g.co/YourFamily येथे तुमच्या लहान मुलाच्या नावावर क्लिक करता, तेव्हादेखील तुमच्या लहान मुलाचे खाते व्यवस्थापित करू शकता.

तुमची नेहमी अनुमती दिलेली अ‍ॅप्स निवडा
महत्त्वाचे: नेहमी अनुमती असलेल्या ॲप्सना Google Kids Space रन करणारी डिव्हाइस वगळता, फक्त Android 7+ डिव्हाइसवर साइन इन केलेल्या लहान मुलांसाठी सपोर्ट आहे. तुमचे लहान मूल Android ची कोणती आवृत्ती वापरत आहे ते त���ासा.
  1. Family Link ॲप Family Link उघडा.
  2. तुमचे लहान मूल निवडा.
  3. नियंत्रणे आणि त्यानंतर ॲपच्या मर्यादा वर टॅप करा.
  4. तुम्हाला हवे असलेले ॲप निवडा.
  5. नेहमी अनुमती द्या always allow आणि त्यानंतर पूर्ण झाले वर टॅप करा.

टिपा:

  • नेहमी अनुमती दिलेल्या ॲप्सची गणना तुमच्या लहान मुलाच्या स्क्रीन वेळ मर्यादांमध्ये केली जात नाही आणि तुमचे लहान मूल डाउनटाइममध्ये असताना ती उपलब्ध नसतात.
  • तुम्ही डिव्हाइस लॉक स्क्रीनवरून हे सेटिंग न बदलल्यास, "लॉक करा" वर टॅप केल्यास, नेहमी अनुमती दिलेली ॲप्स उपलब्ध नसतात.
    1. डिव्हाइस आणि त्यानंतर तुम्हाला अपडेट करायचे असलेले डिव्हाइस निवडा.
    2. लॉक स्क्रीन सेटिंग्ज आणि त्यानंतर नेहमी अनुमती दिलेली ॲप्स वर टॅप करा.
तुमची नेहमी अनुमती दिलेली अ‍ॅप्स संपादित करा
महत्त्वाचे: नेहमी अनुमती असलेल्या ॲप्सना Google Kids Space रन करणारी डिव्हाइस वगळता, फक्त Android 7+ डिव्हाइसवर साइन इन केलेल्या लहान मुलांसाठी सपोर्ट आहे. तुमचे लहान मूल Android ची कोणती आवृत्ती वापरत आहे ते तपासा.
  1. Family Link ॲप Family Link उघडा.
  2. तुमचे लहान मूल निवडा.
  3. नियंत्रणे आणि त्यानंतर ॲपच्या मर्यादा वर टॅप करा.
  4. तुम्हाला हवे असलेले ॲप निवडा.

येथून तुम्ही पुढील गोष्टी करण्याचा पर्याय निवडू शकता:

  • नेहमी अनुमती देणे always allow.
  • वेळ मर्यादा सेट करणे Set limit.
  • ॲप ब्लॉक करणे Block.

टिपा:

  • नेहमी अनुमती दिलेल्या ॲप्सची गणना तुमच्या लहान मुलाच्या स्क्रीन वेळ मर्यादांमध्ये केली जात नाही आणि तुमचे लहान मूल डाउनटाइममध्ये असताना ती उपलब्ध नसतात.
  • तुम्ही डिव्हाइस लॉक स्क्रीनवरून हे सेटिंग न बदलल्यास, "लॉक करा" वर टॅप केल्यास, नेहमी अनुमती दिलेली ॲप्स उपलब्ध नसतात.
    1. डिव्हाइस आणि त्यानंतर तुम्हाला अपडेट करायचे असलेले डिव्हाइस निवडा.
    2. लॉक स्क्रीन सेटिंग्ज आणि त्यानंतर नेहमी अनुमती दिलेली ॲप्स वर टॅप करा.
Google Play वर नवीन ॲप्ससाठी तुमच्या मंजुरीची आवश्यकता असणे

तुमच्या लहान मुलाच्या Google Play वरील खरेदी मंजुरी कशा व्यवस्थापित करायच्या ते जाणून घ्या.

तुमच्या लहान मुलाला प्रौढांसाठीची ॲप्स डाउनलोड करण्यापासून रोखण्यात मदत करा

तुमच्या लहान मुलाला Google Play वरून डाउनलोड किंवा खरेदी करता येऊ शकणारा आशय प्रतिबंधित करण्यासाठी तुम्ही पालक नियंत्रणे सेट करू शकता.

  1. Family Link ॲप Family Link उघडा.
  2. तुमचे लहान मूल निवडा.
  3. नियंत्रणे आणि त्यानंतर आशयासंबंधित निर्बंध आणि त्यानंतर Google Play वर टॅप करा.
  4. "आशयासंबंधित निर्बंध" अंतर्गत तुमचे फिल्टर निवडा:
    • ॲप्स, गेम, चित्रपट आणि टीव्ही: तुम्हाला डाउनलोड किंवा खरेदी करण्याची अनुमती द्यायची असलेल्या आशयाची सर्वोच्च प्रगल्भता पातळी निवडा.
    • संगीत आणि पुस्तके: तुम्हाला भडक आशयाचे डाउनलोड किंवा खरेदी प्रतिबंधित करायची आहे का ते निवडा.

टिपा:

  • तुमचे लहान मूल हे त्यांची खाते सेटिंग्ज स्वतः नियंत्रित करू शकते की नाही, यामुळे ती सेटिंग्ज बदलत नाहीत. पालकांनी हे नियंत्रण बदलल्यानंतर सेटिंग्ज योग्य असल्याची खात्री करावी अशी आम्ही शिफारस करतो.
  • तुम्ही g.co/YourFamily येथे तुमच्या लहान मुलाच्या नावावर क्लिक करता, तेव्हादेखील तुमच्या लहान मुलाचे खाते व्यवस्थापित करू शकता.

अयोग्य आशय फ्लॅग करणे

Google Play

सर्वप्रथम, आशयामध्ये "शिक्षकांद्वारे मंजूर" कुटुंब स्टार बॅज हा बॅज आहे की नाही ते तपासा. तुम्हाला "शिक्षकांद्वारे मंजूर" हा बॅज आढळल्यास, खालील पायऱ्या वगळा आणि कुटुंब आशयासंबंधित समस्येची तक्रार करणे हे कर���. अन्यथा, खालील पायऱ्या फॉलो करा.

Play, ॲप्स, गेम आणि संगीत

  1. तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसवर, Play Store ॲप Play Store उघडा.
  2. अयोग्य संगीत, ॲप किंवा गेमवर टॅप करा.
  3. पेजच्या तळाशी, अयोग्य म्हणून फ्लॅग करा वर टॅप करा.
  4. तुम्हाला आशय अयोग्य का वाटतो त्याचे कारण निवडा.
  5. सबमिट करा वर टॅप करा.
तुमच्या लहान मुलाच्या Play Games प्रोफाइल परवानग्या बदलणे

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या लहान मुलाची Play Games प्रोफाइल सुरू करता, तेव्हा तुमच्या लहान मुलाने सपोर्ट असलेला गेम उघडल्यावर त्यांना आपोआप साइन इन केले जाते.

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Family Link ॲप Family Link उघडा.
  2. तुमचे लहान मूल निवडा.
  3. नियंत्रणे आणि त्यानंतर आशयासंबंधित निर्बंध वर टॅप करा.
  4. Google Play आणि त्यानंतर Google Play Games वर टॅप करा.
  5. लहान मुलाच्या Play Games प्रोफाइलला मंजुरी द्या किंवा लहान मुलाची Play Games प्रोफाइल हटवा निवडा.

टिपा:

  • तुमच्या लहान मुलाने संमतीची विनंती केल्यावर Play Games सेटिंग हे फक्त तुमच्या पालक डिव्हाइसवर दाखवले जाते.
  • पर्यवेक्षित खाते प्रोफाइल त्यांचा गेमप्ले रेकॉर्ड किंवा शेअर करू शकत नाहीत.
  • पर्यवेक्षित खाते प्रोफाइलमध्ये Play Games वर मित्रमैत्रिणी असू शकत नाहीत.
  • पर्यवेक्षित खाते प्रोफाइलना ऑटो-जनरेट केलेला गेमर टॅग दिला जाईल.
  • लहान मुलांसाठी Play Games प्रोफाइल वापरून ऑटोमॅटिक साइन-इनला सर्व गेम सपोर्ट करत नाहीत.

तुम्ही अद्याप Play Games प्रोफाइल तयार केली नसल्यास, ते करू शकता:

  1. तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसवर, Android सेटिंग्ज Settings वर जा.
  2. Google आणि त्यानंतर सर्व सेवा आणि त्यानंतर Google अ‍ॅप्ससाठी सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. Play Games आणि त्यानंतर प्रोफाइल तयार करा वर टॅप करा.
  4. तुमचे गेमरचे नाव आणि अवतार निवडा.
  5. सेव्ह करा वर टॅप करा.
  6. लहान मुलाच्या डिव्हाइसवर नवीन प्रोफाइलला मंजुरी देण्यासाठी, प्रत्यक्षात विचारा वर टॅप करा.
  7. तुमचा पालक पासवर्ड एंटर करा.

दुसऱ्या Play Games प्रोफाइलवर स्विच करण्यासाठी:

  1. तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसवर, Android सेटिंग्ज Settings वर जा.
  2. Google आणि त्यानंतर Google अ‍ॅप्स साठी सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. Play Games आणि त्यानंतर साइन इन केलेले खाते वर टॅप करा.
  4. पुढील गोष्टींसाठी तुमची प्रोफाइल बदला:
    • सर्व गेम
    • गेमचा एक उपसंच
Play Games वर पालक नियंत्रणे सेट करणे

पालक नियंत्रणे ही तुम्ही खरेदी केलेले गेम किंवा शिफारस केलेले गेम, तसेच तुम्हाला Play Games ॲपमध्ये दिसणारे गेम बदलत नाहीत.

तुम्ही Play Games ॲप वापरून गेम इंस्टॉल करायचा प्रयत्न केल्यास, तुम्हाला Play Store वर निर्देशित केले जाईल, जेथे तुमची पालक नियंत्रणे सेटिंग्ज हे ॲक्सेस प्रतिबंधित करू शकतात.

  1. Family Link ॲप Family Link उघडा.
  2. तुमचे लहान मूल निवडा.
  3. सेटिंग्ज व्यवस्थापित करा आणि त्यानंतर Google Play वर टॅप करा.
  4. तुम्हाला फिल्टर करायच्या असलेल्या आशयाच्या प्रकारावर टॅप करा.
  5. फिल्टर कसे करावे किंवा ॲक्सेस कसा प्रतिबंधित करावा हे निवडा.

टीप: तुम्ही g.co/YourFamily येथे तुमच्या लहान मुलाच्या नावावर क्लिक करूनदेखील हे सेटिंग व्यवस्थापित करू शकता.

तुमच्या लहान मुलाची ॲप ॲक्टिव्हिटी तपासणे

तुमचे लहान मूल त्यांच्या Android डिव्हाइसवर किंवा Chromebooks वरील ॲप्सवर किती वेळ घालवते ते तुम्ही तपासू शकता. ॲप उघडे असताना वेळ ट्रॅक केला जातो आणि स्क्रीनवर दाखवला जातो, पण ॲप बॅकग्राउंडमध्ये रन होत असताना तसे केले जात नाही.

  1. Family Link ॲप Family Link उघडा.
  2. तुमचे लहान मूल निवडा.
  3. हायलाइट आणि त्यानंतर स्क्रीन वेळ वर टॅप करा.

समस्या ट्रबलशूट करणे

माझे लहान मूल Google Play मधील ॲप वापरत आहे, जे मला त्यांच्याकडे असायला नको आहे

तुमच्या लहान मुलाने वापरू नये असे तुम्हाला वाटणाऱ्या ॲपचा त्यांना ॲक्सेस असल्यास, ॲप ब्लॉक करण्यासाठी वरील सूचना फॉलो करा.

तुमचे लहान मूल डाउनलोड किंवा खरेदी करत असलेल्या प्रत्येक ॲपला तुम्हाला मंजुरी द्यायची असल्यास, तुमच्या लहान मुलाची खरेदी मंजुरी सेटिंग्ज बदला.

महत्त्वाचे: तुम्ही यापूर्वी इंस्टॉल केलेली किंवा मंजुरी दिलेली ॲप्स अथवा तुमच्या Play कौटुंबिक लायब्ररी द्वारे उपलब्ध असलेली ॲप्स डाउनलोड करण्यासाठी अतिरिक्त मंजुरी लागणार नाही.

मला माझ्या कुटुंबासोबत ॲप्स शेअर करायची आहेत

तुमच्या कुटुंबासोबत पात्र सशुल्क ॲप्स शेअर करण्यासाठी तुम्ही Google Play कौटुंबिक लायब्ररी सेट करू शकता.

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी पालक नियंत्रणे सेट केल्यास, त्यांना तुम्ही निवडलेल्या पालक नियंत्रणे सेटिंग्जच्या बाहेरील कोणतीही ॲप्स दिसणार नाहीत.

"हे ॲप या वेळी मुलांसाठी उपलब्ध नाही" एरर

तुमच्या लहान मुलाने १३ वर्षे वयाखालील (किंवा तुमच्या देशातील लागू असलेले वय) लहान मुलांसाठी उपलब्ध नसलेले Google ॲप डाउनलोड करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना ही एरर दिसेल.

मला माझ्या लहान मुलाची ॲप ॲक्टिव्हिटी ट्रॅक करायची नाही

तुम्हाला तुमच्या लहान मुलाच्या ॲप ॲक्टिव्हिटीचे निरीक्षण करायचे नसल्यास, तुम्ही अतिरिक्त Family Link ॲप ॲक्टिव्हिटी सेटिंग बंद करू शकता.

महत्त्वाचे: तुम्ही हे सेटिंग बंद केल्यास, तुमच्या लहान मुलाचा Family Link ॲप ॲक्टिव्हिटी डेटा हटवला जाईल.

  1. Family Link ॲप Family Link उघडा.
  2. तुमचे लहान मूल निवडा.
  3. नियंत्रणे आणि त्यानंतर खाते सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. गोपनीयता सेटिंग्ज आणि त्यानंतर Family Link ॲप ॲक्टिव्हिटी वर टॅप करा.
  5. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

संबंधित लेख 

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
17452392426378844968
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false