खरेदीसाठी पडताळणी आवश्यक आहे

खरेदी पडताळणी सुरू केल्याने, तुमच्या डिव्हाइसवर अनधिकृत खरेदी रोखण्यात मदत होते.

तुम्ही पडताळणी सुरू केलेली असल्यास, तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या डिव्हाइसवर Google Play द्वारे खरेदी करता, तेव्हा तुम्हाला हे तुम्हीच असल्याची पडताळणी करण्यासाठी बायोमेट्रिक किंवा तुमचा Google खाते पासवर्ड वापरण्याची विनंती केली जाईल. आवश्यक असल्यास, तुम्ही तुमचा Google खाते पासवर्ड बदलणे किंवा रीसेट करणे हे करू शकता.

बायोमेट्रिक म्हणजे तुमच्या फोनवर स्टोअर केलेले कोणतेही फिंगरप्रिंट किंवा फेस मॉडेल. लक्षात ठेवा, की तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेली कोणतीही बायोमेट्रिक ही पडताळणीसाठी वापरली जाऊ शकतात. तुम्ही तुमचे डिव्हाइस शेअर केल्यास आणि पडताळणीची प��्धत म्हणून बायोमेट्रिक निवडल्यास, तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेली सर्व बायोमेट्रिक पडताळणीसाठी वापरण्यास तुम्हाला सोयीची वाटत असल्याची खात्री करा.

महत्त्वाचे: खरेदीची पडताळणी सेटिंग्ज ही फक्त Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे केलेल्या खरेदीना लागू होतात.

दक्षिण कोरियामधील खरेदी पडताळणी

Google Play वरील खरेदी पडताळणी हे तुमच्या डिव्हाइसवरील अनधिकृत खरेदी रोखण्यात मदत करते. तुम्ही तुमचे डिव्हाइस इतरांसोबत शेअर करत असल्यास, हे विशेषतः महत्त्वाचे आहे. दक्षिण कोरियामधील Google Play वापरकर्ते Google Play द्वारे त्यांच्या खरेदीची पडताळणी कशी करतात यामधील बदल खाली नोंदवले पाहिजेत:

  • तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर
    • तुम्ही तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर Google Play Store ला भेट देता, तेव्हा तुम्ही तुमच्या Google खाते पासवर्डऐवजी तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी वापराल तीच पडताळणी पद्धत (उदा. पिन, पॅटर्न, पासवर्ड किंवा बायोमेट्रिक) वापरून खरेदीची पडताळणी कराल.
    • तुमचे Google Play खरेदी ऑथेंटिकेशन सेटिंग हे एकाच डिव्हाइस आणि Google खाते वर लागू होते. तुम्ही Google Play मध्ये ऑथेंटिकेशनची वारंवारता कधीही बदलू शकता.
    • तुमचे डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी बायोमेट्रिकला (जसे की तुमचा फेस किंवा फिंगरप्रिंट) सपोर्ट करत असल्यास आणि तुम्ही ते वैशिष्ट्य सुरू केले असल्यास, डिव्हाइसवर स्टोअर केलेल्या कोणत्याही बायोमेट्रिकलादेखील Google Play वरील तुमच्या खरेदीच्या पडताळणी करता येईल. डिव्हाइस अनलॉक करण्यासाठी तुम्ही इतरांची बायोमेट्रिक स्टोअर केली असल्यास आणि तुम्हाला ती खरेदी पडताळणीसाठीदेखील सुरू करायची नसल्यास, हे महत्त्वाचे आहे. या बाबतीमध्ये, तुम्हाला खरेदी पडताळणीसाठी वापरायचे नसलेली कोणतीही बायोमेट्रिक तुमच्या डिव्हाइसवरून काढून टाका किंवा सुरक्षा (जसे की पिन, पॅटर्न किंवा पासवर्ड) अनलॉक करण्यासाठी दुसऱ्या प्रकारचे डिव्हाइस वापरा आणि ते शेअर करू नका.
    • अधिक माहिती शोधण्यासाठी, Android डिव्हाइसवर स्क्रीन लॉक कसे सेट करावे हे जाणून घ्या हे करण्यासाठी Android मदत केंद्र ला भेट द्या.
  • वेबवर play.google.com
    • play.google.com येथे वेबवर खरेदी आणि ॲप इंस्टॉलची पडताळणी करण्यासाठी, तुम्हाला २ टप्पी पडताळणी वापरावी लागेल, जी तुमच्या खात्याचे संरक्षण करण्यात मदत करते. अधिक माहिती शोधण्यासाठी, २ टप्पी पडताळणी कशी सुरू करावी हे जाणून घ्या हे करण्यासाठी Google खाते मदत केंद्र ला भेट द्या. कृपया लक्षात ठेवा, की सुरक्षा प्रोटोकॉलमुळे काही वापरकर्त्यांना त्यांनी २ टप्पी पडताळणी सेट केल्यानंतर त्यांना ती play.google.com येथे वेबवर व्यवहार करताना वापरता येण्यापूर्वी प्रतीक्षा कालावधी पूर्ण करावा लागू शकतो. तुम्ही play.google.com/settings मध्ये कधीही खरेदी पडताळणी सेटिंग्ज बदलू शकता.

पडताळणी सुरू किंवा बंद करणे

तुमच्या play.google.com सेटिंग्जच्या आणि सर्व डिव्हाइसना लागू होणाऱ्या ठरावीक Google Assistant सेटिंग्जच्या व्यतिरिक्त पडताळणी सेटिंग्ज ही फक्त तुम्ही ती सेट केलेल्या डिव्हाइसवरील अ‍ॅक्टिव्ह खात्याला लागू होतात. तुम्ही तुमचे Google खाते एकाहून अधिक डिव्हाइसवर वापरत असल्यास, प्रत्येक डिव्हाइस��ाठी खालील पायऱ्या रिपीट करा. तुमच्या डिव्हाइसवर तुम्ही एकाहून अधिक खाती वापरत असल्यास, डिव्हाइसवरील प्रत्येक खात्यासाठी खालील पायऱ्या रिपीट करा.

टीप: खरेदी पडताळणी सुरू करून, तुमच्या डिव्हाइसवर कुटुंब विभागाच्या बाहेर उपलब्ध असलेल्या ॲप्स आणि गेममधून चुकून होणारी खरेदी रोखण्यात मदत करू शकता. १२ वर्षे किंवा त्याखालील वयोगटांसाठी डिझाइन केलेल्या ॲप्स किंवा गेममध्ये, त्यांनी ॲपमधील काहीही खरेदी करण्यापूर्वी Google Play हे वापरकर्त्याची पुन्हा पडताळणी करेल. यामुळे लहान मुलाने केलेल्या खरेदीला आर्थिकदृष्ट्या जबाबदार व्यक्तीने मंजुरी दिली असल्याची खात्री करण्यात मदत होते.

तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर पडताळणी सेटिंग्ज बदलणे
  1. Google Play अ‍ॅप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर खरेदीची पडताळणी आणि त्यानंतर पडताळणीची वारंवारता वर टॅप करा.
  4. सेटिंग निवडा.
  5. बदल कन्फर्म करा.
तुमची Google Assistant पडताळणी सेटिंग्ज बदलणे
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, "Ok Google, Assistant सेटिंग्ज उघड" असे म्हणा.
  2. "लोकप्रिय सेटिंग्ज" या अंतर्गत, तुम्ही आणि त्यानंतर पेमेंट वर टॅप करा.
  3. Assistant वापरून पेमेंट करा सुरू किंवा बंद करा.
  4. फिंगरप्रिंट किंवा चेहरा वापरून कंफर्म करा आणि Voice Match वापरून कंफर्म करा हे सुरू किंवा बंद करा.

Voice Match वापरून पेमेंट कसे करावे ते जाणून घ्या.

तुमच्या Chromebook वरील पडताळणी सेटिंग्ज बदला

तुम्ही तुमच्या Chromebook वर Play Store ॲप वापरत असल्यास:

  1. Google Play Store अ‍ॅप Google Play उघडा.
  2. मेनू मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. पडताळणी प्राधान्ये वर क्लिक करा.
  4. सेटिंग निवडा.
  5. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

टिपा:

  • तुम्ही तुमच्या Chromebook वर Google Play Store ॲप वापरत असाल, तरच हे काम करेल. क्रोमबुकवर Google Play Store वापरणे हे कसे करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.
  • पडताळणी सेटिंग्ज बदलण्यासाठी, तुम्हाला तुमच्या Google च्या पासवर्डची आवश्यकता असेल. तुम्हाला तुमचा पासवर्ड आठवत नसल्यास, खाते रिकव्हरी ला भेट द्या.
(निवडक डिव्हाइसवर) बायोमेट्रिक पडताळणी सुरू किंवा बंद करा 

बायोमेट्रिक पडताळणी सुरू केलेली असताना, प्रत्येक वेळी खरेदी कराल, तेव्हा हे तुम्हीच असल्याची खात्री करण्यासाठी तुम्हाला तुमची फिंगरप्रिंट किंवा चेहरा वापरण्यास सांगितले जाईल.

महत्त्वाचे: तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेली सर्व बायोमेट्रिक ही तुमच्या Google खाते द्वारे केलेल्या खरेदीची पडताळणी करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. तुम्ही इतरांसोबत तुमचे डिव्हाइस शेअर करत असल्यास, हे लक्षात ठेवा.
  1. Google Play अ‍ॅप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर खरेदी पडताळणी वर टॅप करा.
  4. बायोमेट्रिक पडताळणी सुरू किंवा बंद करण्यासाठी प्रॉम्प्ट फॉलो करा.
टीप: Google Play मध्ये बायोमेट्रिक पडताळणी सुरू करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या Google पासवर्डची आवश्यकता असू शकते. तुम्हाला तुमचा पासवर्ड आठवत नसल्यास, खाते रिकव्हरी वर जा. मोबाइल डिव्हाइससाठी, तुम्ही बायोमेट्रिक वापरून तुमच्या सेटिंगमधील बदल कन्फर्म करू शकता.
Android TV वरील पडताळणी सेटिंग्ज बदला
टीप: पडताळणी सेटिंग्ज बदलण्यासाठी, तुम्हाला तुमच्या Google च्या पासवर्डची आवश्यकता असेल. तुम्हाला तुमचा पासवर्ड आठवत नसल्यास, खाते रिकव्हरी वर जा.
play.google.com वर तुमची पडताळणी सेटिंग्ज बदला
हे सेटिंग Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे केलेल्या खरेदीला लागू होते. वेबद्वारे केलेल्या सर्व रिमोट ॲप इंस्टॉलसाठी पडताळणी आवश्यक आहे.
  1. play.google.com वर जा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल आयकनवर क्लिक करा.
  3. सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. "पडताळणी प्राधान्ये" या अंतर्गत, सेटिंग निवडा.
  5. अपडेट करा वर क्लिक करा.
टीप: पडताळणी सेटिंग्ज बदलण्यासाठी तुम्हाला Google च्या पासवर्डची आवश्यकता असेल. तुम्हाला तुमचा पासवर्ड आ��वत नसल्यास, खाते रिकव्हरी ला भेट द्या.
तुमच्या कॉंप्युटरवर Google Play Games मध्ये पडताळणी सेटिंग्ज बदला
  1. तुमच्या काँप्युटरवर, Google Play Games उघडा.
  2. सर्वात वरती, तुमच्या गेमर नावावर क्लिक करा.
  3. सेटिंग्ज Settings वर क्लिक करा.
  4. "खरेदी पडताळणी" च्या बाजूला, रीसेट करा वर क्लिक करा.

पडताळणी सेटिंग्ज म्हणजे काय

तुम्ही खरेदीसाठीची पडताळणी तात्पुरती बंद केल्यास, त्यामुळे अनधिकृत खरेदी होऊ शकते. चुकून केलेल्या किंवा अनधिकृत खरेदीच्या समावेशासह सर्व शुल्कांची जबाबदारी तुमची असेल.

टिपा:

  • तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी, प्रत्येक खरेदीसाठी खरेदी पडताळणी सुरू करा.
  • सेटिंग निवडले आहे अशाच डिव्हाइसवरील Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे केलेल्या खरेदीला पडताळणी सेटिंग्ज लागू होतात.
  • तुमची सेटिंग्ज वेगळ्या पद्धतीने सेट केली असली, तरीही १२ वर्षे आणि त्याखालील वयोगटांसाठी डिझाइन केलेल्या अ‍ॅप किंवा गेमकरिता Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे केलेल्या प्रत्येक खरेदीसाठी पडताळणी नेहमीच आवश्यक असते.
  • तुम्ही Google Play वर कुटुंब गट तयार करता, तेव्हा तुमचे कुटुंब सदस्य Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे खरेदी करण्यासाठी कुटुंब पेमेंट पद्धत वापरू शकतात. कुटुंब गट कसा सेट आणि व्यवस्थापित करावा ते जाणून घ्या.
play.google.com व्यतिरिक्त इतर सर्व डिव्हाइससाठी

पडताळणी वारंवारतेसाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत:

  • सर्व खरेदीची पडताळणी करा: ॲप्समधील खरेदीच्या समावेशासह, Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक डिजिटल आशयाच्या खरेदीसाठी पडताळणी आवश्यक आहे.
  • दर ३० मिनिटांनी खरेदीची पडताळणी करा (फक्त मोबाइल डिव्हाइससाठी): प्रत्येक वेळी तुम्ही खरेदीची पडताळणी केल्यानंतर ३० मिनिटांसाठी तुम्हाला पुन्हा पडताळणी न करता Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे (अ‍ॅप्समधील खरेदीच्या समावेशासह) सर्व प्रकारचा डिजिटल आशय खरेदी करणे पुढे सुरू ठेवता येते.
  • कधीही खरेदीची पडताळणी करू नका: Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे केल्या जाणाऱ्या कोणत्याही खरेदीसाठी पडताळणीची आवश्यकता नाही.
play.google.com साठी

तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवर play.google.com मध्ये साइन इन केलेले असते, तेव्हा आणि Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे केलेल्या खरेदीनाच ही सेटिंग्ज लागू होतात. या सेटिंग्जचा तुमच्या play.google.com बाहेरील (उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर Google Play ॲपमध्ये असता, तेव्हा) पडताळणी सेटिंग्जवर कोणताही परिणाम होत नाही.

play.google.com वरील सर्व खरेदी आणि ॲप इंस्टॉल (डी��ॉल्ट सेटिंग): Google खाते वापरून play.google.com वर केल्या जाणाऱ्या प्रत्येक डिजिटल आशयाच्या खरेदीसाठी पडताळणी आवश्यक आहे.

फक्त play.google.com वरील ॲप इंस्टॉल: तुम्ही play.google.com मध्ये साइन इन केलेले असते, तेव्हा सशुल्क आशय आणि ॲपमधील खरेदी यांसारख्या डिजिटल आशयाच्या खरेदीसाठी पडताळणी आवश्यक नसते. तुमचे Google खाते वापरून play.google.com वरून करायच्या असलेल्या रिमोट ॲप इंस्टॉलेशनसाठी पडताळणी आवश्यक आहे.

टिपा:

  • तुम्ही तुमची डिव्हाइस इतरांसोबत शेअर करत असल्यास किंवा play.google.com वरून मुलांसाठी अनुकूल आशयाची खरेदी रोखायची असल्यास, खरेदीसाठीची पडताळणी सुरू करा.
  • पडताळणी सेटिंग्ज ही फक्त Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे केलेल्या खरेदीना लागू होतात.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
12962313639250934981
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false