तुमचा Google Play Store अनुभव पर्सनलाइझ करा

तुमचा पर्सनलाइझ केलेला Google Play Store अनुभव समजून घेणे

तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा करण्यासाठी, Google Play तुम्हाला तुमच्यासाठी अनुकूल केलेला सुसंबद्ध आशय पुरवू शकते, ज्यामध्ये अ‍ॅप आणि पुस्तकासंबंधी शिफारशी, ऑफर आणि शोध परिणाम यांचा समावेश असू शकतो. संपूर्ण Play व्यवस्थेवर तुम्हाला सर्वोत्तम अनुभव पुरवण्यात मदत होण्यासाठी या शिफारशी आणि ऑफर Google Play मध्ये, त्याचप्रमाणे Google Play ने व्यवस्थापित केलेल्या अ‍ॅप्स आणि गेम यांमध्ये प्रेझेंट केल्या जाऊ शकतात. तुमचे अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी Play वापरत असलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीची काही उदाहरणे म्हणजे तुमचे शोध, इंप्रेशन, Google Play Games शी संबंधित अ‍ॅक्टिव्हिटी आणि तुमची Google Play Games प्रोफाइल व तुमची अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी.

पर्सनलायझेशन आणि अ‍ॅक्टिव्हिटी संग्रह सुरू किंवा बंद करणे

तुमची Google Play पर्सनलायझेशन सेटिंग्ज संपादित करण्यासाठी:

  1. Google Play Store Google Play उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर Play मधील पर्सनलायझेशन आणि त्यानंतर Play पर्सनलायझेशन आणि इतिहास वर टॅप करा.
  3. वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू किंवा बंद करा.

टिपा:

  • तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या आधारावर अधिक जलद आणि सुधारित शोध परिणाम, अ‍ॅप व आशय यांसंबंधी शिफारशी आणि ऑफर व तुम्ही सर्वाधिक वेळा वापरत असलेल्या अ‍ॅप्ससाठी अधिक जलद अ‍ॅप अपडेट मिळू शकतात.
  • तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद करता, तेव्हा Google Play तुमची भविष्यातील अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह करणार नाही किंवा तो डेटा त्याला तुमचा Google Play अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी वापरता येणार नाही.

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमची पर्सनलायझेशन प्राधान्ये व्यवस्थापित करणे

महत्त्वाचे: वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद केलेली असल्यास, तुम्ही Play पर्सनलायझेशन पर्याय व्यवस्थापित करू शकत नाही.

तुम्हाला सर्व डेटा प्रकारांसाठी पर्सनलायझेशन सुरू करायचे नसल्यास, Google Play Store मधील परिणाम आणि तुमच्यासाठी शिफारस केलेले पर्सनलाइझ करण्याकरिता Play तुमच्या खात्यामधील डेटाचे कोणते प्रकार वापरते हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

टीप: तुमचे बदल लागू होण्यासाठी कमाल २४ तास लागू शकतात.

तुमच्या डिव्हाइसचे तपशील

अधिक पर्सनलाइझ केलेले अनुभव पुरवण्यासाठी Play हे तुम्ही Google Play मध्ये वापरलेल्या डिव्हाइसबद्दलची माहिती वापरू शकते, जसे की उत्पादक किंवा मॉडेल.

पर्सनलायझेशनमध्ये सुधारणा करण्यासाठी Play तुमच्या खात्याशी संबंधित डिव्हाइसबद्दलची माहिती वापरू शकते का हे नियंत्रित करण्याकरिता:

  1. Google Play Store Google Play उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर Play मधील पर्सनलायझेशन आणि त्यानंतर इतर Play पर्सनलायझेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. तुमच्या डिव्हाइसचे तपशील सुरू किंवा बंद करा.

तुम्ही डिव्हाइसच्या तपशिलांवर आधारित पर्सनलायझेशन बंद केल्यास, आम्ही तुमच्या डिव्हाइससाठी योग्य अ‍ॅप्स आणि गेम डिलिव्हर करू शकत असल्याची खात्री करण्यासाठी, तुम्ही Play Store ब्राउझ करत असताना योग्य अनुभव डिलिव्हर करण्यासाठी आम्ही डिव्हाइसचे तपशील वापरणे सुरू ठेवू.

तुमचा Play आशय

तुम्ही Play द्वारे खरेदी केलेली किंवा विकत घेतलेली अ‍ॅप्स, पुस्तके किंवा गेम यांसारख्या आयटमच्या आधारावर तुमचा अनुभव पर्सनलाइझ करू शकता. Play Store मधील पर्सनलायझेशनसाठी आणि संपूर्ण Play व्यवस्थेवरील इतर अनुभवांसाठी त्या आयटमशी संबंधित डेटा वापरू नये असे तुम्ही Play ला सांगू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही विशिष्ट अ‍ॅपसाठी पर्सनलायझेशन बंद केल्यास, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी, खरेदी, ऑफर, तुम्ही ते अ‍ॅप कधी इंस्टॉल किंवा अनइंस्टॉल केले आणि Google Play Games शी संबंधित अ‍ॅक्टिव्हिटी व त्या अ‍ॅपशी संलग्न असलेली तुमची Google Play Games प्रोफाइल यांसारखा डेटा पर्सनलायझेशनसाठी वापरला जाणार नाही.

तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी कोणते आयटम वापरले जाऊ शकतात हे नियंत्रित करण्यासाठी:

  1. Google Play Store Google Play उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर Play मधील पर्सनलायझेशन आणि त्यानंतर इतर Play पर्सनलायझेशन सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. “तुमचा Play आशय” या अंतर्गत, व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. “तुमचा आशय” या अंतर्गत, विशिष्ट अ‍ॅप्स किंवा आशय सुरू अथवा बंद करा.

तुमचा डेटा किती काळ स्टोअर केला जावा हे निवडणे

तुमची Play इतिहासासंबंधी माहिती किती काळ सेव्ह केली जावी हे तुम्ही निवडू शकता आणि ती कधीही हटवू शकता.

तुमची Play इतिहासासंबंधी माहिती किती काळ स्टोअर केली जावी हे बदलण्यासाठी:

  1. Google Play Store Google Play उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर Play मधील पर्सनलायझेशन आणि त्यानंतर Play इतिहास वर टॅप करा.
  3. “ऑटो-डिलीट (सुरू)” या अंतर्गत, X महिन्यांहून जुना इतिहास हटवणे वर टॅप करा.
    • तुम्ही यापूर्वी ऑटो-डिलीट बंद केले असल्यास, “ऑटो-डिलीट (बंद)” या अंतर्गत, ऑटो-डिलीटचा पर्याय निवडा वर टॅप करा.
  4. तुम्हाला तुमची अ‍ॅक्टिव्हिटी किती काळ ठेवायची आहे त्यासाठीचा पर्याय निवडा.
  5. पुढील वर टॅप करा.
  6. तुमचा प्राधान्य दिलेला कालावधी सेव्ह करण्यासाठी, कन्फर्म करा वर टॅप करा.

तुमचा अलीकडील Play इतिहास पाहणे

तुम्ही तुमच्या Play इतिहासामध्ये गोळा केलेल्या Play Store अ‍ॅक्टिव्हिटीचे पुनरावलोकन करू शकता.

तुमचा अलीकडील Play इतिहास पाहण्यासाठी:

  1. Google Play Store Google Play उघडा.
  2. तुमचा प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर Play मधील पर्सनलायझेशन आणि त्यानंतर Play इतिहास वर टॅप करा.
  3. स्क्रीनच्या तळाशी अर्ध्या भागात, तुम्हाला अलीकडील Play इतिहास सापडेल.

संबंधित स्रोत

तुमची वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी शोधणे व नियंत्रित करणे 

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
1232760763268141331
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false