तुमच्या खात्याशी संबंधित पेमेंट समस्यांचे निराकरण करा

तुम्ही Google Play वर काहीतरी खरेदी करण्याचा प्रयत्न केल्यास, पण तुमचे पेमेंट नाकारले गेल्यास किंवा त्यावर प्रक्रिया होत नसल्यास, खालील पायऱ्या वापरून पहा.

पेमेंट आणि ऑर्डरशी संबंधित समस्या ट्रबलशूट करणे

तुम्ही काही खरेदी केली असल्यास आणि त्यामध्ये काही समस्या येत असल्यास किंवा त्यासंबंधी काही प्रश्न असल्यास, अ‍ॅपमधील खरेदीशी संबंधित समस्या किंवा Google Play वरून खरेदी केलेल्या गोष्टी परत करणे आणि परतावा मागणे हे पहा.

तुमच्या पेमेंट माहितीची पडताळणी करा

तुमची पेमेंट प्रोफाइल कदाचित डीॲक्टिव्हेट केली जाऊ शकते. तुमची प्रोफाइल पुन्हा ॲक्टिव्हेट करण्यासाठी, तुमची पेमेंट माहिती सबमिट करा.

  1. Google Pay मध्ये साइन इन करणे.
  2. सर्वात वरती, अलर्ट Notification bell icon निवडा.
  3. तुमच्याकडे रेड अलर्ट असल्यास, तुमची पेमेंट माहिती एंटर करा आणि टीमच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करा.

    Google Pay notifications
  4. पुनरावलोकनाच्या परिणामांसाठी तुमचा ईमेल पहा.

वेगळी पेमेंट पद्धत वापरून पेमेंट करण्याचा प्रयत्न करणे

एका पेमेंट पद्धतीमध्ये काही समस्या येत असल्यास, तुम्ही दुसरी एखादी पेमेंट पद्धत वापरून पाहू शकता.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. तुम्हाला खरेदी करायच्या असलेल्या आयटमवर परत जा आणि किमतीवर टॅप करा.
  3. सध्याच्या पेमेंट पद्धतीवर टॅप करा.
  4. वेगळी पेमेंट पद्धत निवडा किंवा नवीन पद्धत जोडा.
  5. तुमची खरेदी पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

क्रेडिट आणि डेबिट कार्डसंबंधी एररचे निराकरण करणे

तुम्हाला खालीलपैकी एक एरर मेसेज दिसल्यास, तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डमध्ये समस्या असू शकते:

  • "पेमेंटवर प्रक्रिया करू शकत नाही: कार्डमध्ये कमी शिल्लक आहे"
  • "व्यवहार पूर्ण करता आला नाही. कृपया दुसरी पेमेंट पद्धत वापरा"
  • "तुमचा व्यवहार पूर्ण केला जाऊ शकत नाही"
  • "व्यवहार पूर्ण करता आला नाही: कार्ड एक्स्पायर झाले"
  • "या कार्डच्या माहितीमध्ये सुधारणा करा किंवा दुसरे कार्ड वापरून पाहा"

या एररचे निराकरण करण्यासाठी, पुढील पायऱ्या वापरून पहा:

तुमचे कार्ड आणि पत्त्याची माहिती अप टू डेट असल्याची खात्री करा

एक्स्पायर झालेली क्रेडिट कार्ड किंवा जुना बिलिंग पत्ता हे पेमेंट योग्यरीत्या काम न करण्याचे सामान्य कारण आहे. ही माहिती अपडेट करण्यासाठी Google Payments वापरा:

एक्स्पायर झालेली क्रेडिट कार्ड काढून टाका किंवा अपडेट करा

एक्स्पायर झालेल्या कार्डमुळे पेमेंट नाकारली जाऊ शकतात. एक्स्पायर झालेली कार्ड अपडेट करण्यासाठी:

  1. तुमचे Google खाते वापरून https://payments.google.com मध्ये साइन इन करा.
  2. तुम्ही खरेदी करण्यासाठी जी पेमेंट पद्धत वापरण्याचा प्रयत्न करत आहात ती शोधा.
  3. सूचीबद्ध केलेल्या पेमेंट पद्धतींची एक्स्पायरीची तारीख तपासा.
  4. कोणत्याही एक्स्पायर झालेल्या पेमेंट पद्धती काढून टाका किंवा अपडेट करा.

तुमच्या कार्डचा पत्ता Google Payments च्या पत्त्याशी जुळत आहे का ते तपासा

तुमचे क्रेडिट कार्ड वेगळ्या पत्त्यावर नोंदवले असल्यास, पेमेंट नाकारले जाऊ शकते. पिनकोड तुमच्या सध्याच्या पत्त्याशी जुळत असल्याचे तपासा.

  1. तुमचे Google खाते वापरून https://payments.google.com मध्ये साइन इन करा.
  2. तुम्ही खरेदी करण्यासाठी जी पेमेंट पद्धत वापरण्याचा प्रयत्न करत आहात ती शोधा.
  3. संपादित करा वर क्लिक करा.
  4. सूचीमध्ये असलेला पत्ता तुमच्या कार्डच्या बिलिंग पत्त्याशी जुळत असल्याचे तपासा.
  5. आवश्यक असल्यास, पत्ता अपडेट करा.

त्यानंतर, खरेदी करण्याचा पुन्हा प्रयत्न करा.

विनंती केलेली कोणतीही अतिरिक्त माहिती सबमिट करा

Google कडे अतिरिक्त माहिती सबमिट करण्याच्या सूचनेनंतर एरर मेसेज आल्यास, कृपया ती सबमिट करा. या माहितीशिवाय, आम्ही तुमच्या खात्यावरील व्यवहारावर प्रक्रिया करू शकत नाही.

तुमच्याकडे खरेदीसाठी पुरेसे पैसे आहेत का ते तपासा

काही वेळा पु��ेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे व्यवहार नाकारला जातो. खरेदी पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी शिल्लक असल्याची खात्री करण्याकरिता तुमचे खाते तपासा.

तुमची बँक किंवा कार्ड जारीकर्त्याशी संपर्क साधा

तुमच्या कार्डवर विशिष्ट निर्बंध असल्यामुळे, व्यवहार नाकारला गेला असावा. व्यवहाराबाबत विचारण्यासाठी तुमचे कार्ड जारी केलेल्या संस्थेशी संपर्क साधा आणि नाकारले जाण्याचे कारण त्यांना माहीत आहे का ते पहा.

भारतामधील PayTM वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती

महत्त्वाचे: १५ जुलैपासून, PayTM ईवॉलेट ही यापुढे Google Play वर स्वीकारली जाणारी पेमेंट पद्धत म्हणून उपलब्ध नसेल.

वापरकर्त्यांनी त्यांच्या Play खात्यामध्ये पर्यायी पेमेंट पद्धती जोडाव्यात असा सल्ला त्यांना दिला जातो. व्यत्यय टाळण्यासाठी, वापरकर्त्यांना पर्यायी पेमेंट पद्धत वापरून त्यांची सद्य सदस्यत्वे अपडेट करणे हेदेखील करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या पेमेंट पद्धती कशा व्यवस्थापित कराव्यात आणि भारतामधील Google Play वर स्वीकारल्या जाणाऱ्या पेमेंट पद्धती यांची सूची कशी व्यवस्थापित करावी हे जाणून घ्या.

भारतामधील मोबाइल बिलिंग वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती

महत्त्वाचे: ३१ जुलै २०२४ पासून, Idea आणि Vodafone मोबाइल बिलिंग हे Google Play वर स्वीकारली जाणारी पेमेंट पद्धत म्हणून निलंबित केले जाईल.

वापरकर्त्यांनी त्यांच्या Play खात्यामध्ये पर्यायी पेमेंट पद्धती जोडाव्यात असा सल्ला त्यांना दिला जातो. व्यत्यय टाळण्यासाठी, वापरकर्त्यांना पर्यायी पेमेंट पद्धत वापरून त्यांची सद्य सदस्यत्वे अपडेट करणे हेदेखील करण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या पेमेंट पद्धती कशा व्यवस्थापित कराव्यात आणि भारतामधील Google Play वर स्वीकारल्या जाणाऱ्या पेमेंट पद्धती यांची सूची कशी व्यवस्थापित करावी हे जाणून घ्या.

इतर पेमेंट पद्धती (थेट वाहक बिलिंग, ऑनलाइन बँकिंग, Google Play शिल्लक, भेटकार्ड आणि आणखी बरेच काही) यांच्याशी संबंधित एररचे निराकरण करा

"तुमच्या खात्यामध्ये समस्या असल्यामुळे तुमचे पेमेंट नाकारले गेले होते" असे तुम्हाला दिसल्यास

तुम्हाला हा मेसेज दिसल्यास, त्याची पुढील कारणे असू शकतात:

  • आम्हाला तुमच्या पेमेंट प्रोफाइलवर संशयास्पद व्यवहार दिसला आहे.
  • तुमच्या खात्याचे घोटाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी आम्हाला थोडी आणखी माहिती हवी आहे.
  • ईयू कायद्याचे पालन करण्यासाठी आम्हाला थोडी आणखी माहिती हवी आहे (फक्त युरोपियन युनियनच्या सदस्य देशांमधील ग्राहकांसाठी).

या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी:

  1. पेमेंट केंद्र वर जा.
  2. पेमेंट केंद्रामधील कोणत्याही एरर किंवा विनंत्यांवर कृती करा.
    • तुम्हाला तुमच्या Google खाते वरून काहीही खरेदी करता येण्यापूर्वी कदाचित तुमच्या ओळखीची पडताळणी करण्याची आवश्यकता असू शकते.
  3. तुमचे नाव, पत्ता, आणि पेमेंट माहिती अप टू डेट असल्याची खात्री करा.
���ुम्ही थेट वाहक बिलिंगद्वारे पेमेंट करण्याचा प्रयत्न करत असल्यास (तुमच्या मोबाइल सेवा पुरवठादार बिलद्वारे पेमेंट करा)

तुम्हाला थेट वाहक बिलिंगद्वारे पैसे देण्यात समस्या येत असल्यास, पुढील गोष्टी करण्याचा प्रयत्न करा:

  • तुम्ही तुमच्या वाहक नेटवर्कशी थेट किंवा वाय-फायद्वारे कनेक्ट केलेले असल्याची खात्री करा.
  • तुम्ही पेमेंट पद्धत म्हणून थेट वाहक बिलिंग जोडले असल्याची खात्री करा.
  • तुम्ही स्‍थानिक चलन वापरत असल्याची खात्री करा.

तुम्हाला तरीही समस्या येत असल्यास, मदतीसाठी तुमच्या मोबाइल फोन सेवा पुरवठादाराशी संपर्क साधा.

तुम्ही पेमेंट पद्धत जोडू शकत नसल्यास किंवा वेगळ्या प���मेंट पद्धतीमध्ये समस्या येत असल्यास

तुम्हाला वेगळ्या पेमेंट पद्धतीमध्ये समस्या येत असल्यास, समस्येचे निराकरण करण्यासाठी Google Payments वर जा.

  1. तुमचे Google खाते वापरून https://payments.google.com मध्ये साइन इन करा.
  2. माहिती मागणाऱ्या कोणत्याही सूचना किंवा विनंत्या शोधा आणि मागितलेली कोणतीही माहिती पुरवा.
  3. तुमचा पत्ता अप टू डेट असल्याचे तपासा.
  4. तुम्हाला वापरायच्या असलेल्या पेमेंट पद्धती सूचीबद्ध केल्या आहेत का ते तपासा.

तुम्ही खरेदी करत असताना तुम्हाला "तुमचा व्यवहार पूर्ण केला जाऊ शकत नाही" असा एरर मेसेज दिसल्यास

वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये हा मेसेज ट्रिगर होऊ शकतो. समस्येचे निराकरण करण्यासाठी, या सूचना वापरून पहा:

  • या मेसेजनंतर आम्हाला अतिरिक्त माहिती सबमिट करण्यासंबंधित सूचना दिल्या असल्यास, कृपया सूचनांचे पालन करा. ही समस्या सोडवण्यासाठी इतर पायऱ्यांचा कदाचित उपयोग होणार नाही.
  • तुमच्या पेमेंट पद्धतीचा बिलिंग पत्ता हा तुमच्या GPay सेटिंग्ज मधील पत्त्याशी जुळतो की नाही हे तपासा. ते जुळत नसल्यास, Google Pay मध्ये तुमचा पत्ता अपडेट करणे हे करा आणि व्यवहार पुन्हा करून पहा.
  • पुन्हा प्रयत्न करा आणि तुमच्या डिव्हाइससाठी सर्वोत्तम इंटरफेस वापरा:
    • डेस्कटॉप किंवा कॉप्युटरसाठी, Google उत्पादनांच्या वेबसाइटवरून व्यवहार करा.
    • मोबाइल डिव्हाइससाठी, उपलब्ध असल्यास, उत्पादनाचे मोबाइल अ‍ॅप वापरा.
  • एरर आली तेव्हा, तुम्ही अतिथी चेकआउट वापरले असल्यास:
कार्ड निकामी केले असून “payments.google.com वर पडताळणी करा” असे नमूद केले आहे

तुमचे कार्ड चोरी झाल्याचे नोंदवले आहे. तुम्ही कार्ड पुन्हा वापरण्यापूर्वी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे:

  1. payments.google.com वर जा आणि तुमच्या खात्यामध्ये साइन इन करा.
    1. तुमच्याकडे एकाहून अधिक खाती असल्यास, निकामी झालेले कार्ड वापरून खात्यामध्ये साइन इन करा.
  2. पेमेंट पद्धती वर क्लिक करा.
  3. “पडताळणी आवश्यक आहे” असे नमूद केलेल्या कार्डच्या बाजूला, पडताळणी करा आणि त्यानंतर कार्डवर शुल्क आकारा वर क्लिक करा.
  4. दोन दिवसांमध्ये, तुम्हाला तुमच्या कार्ड विवरणावर आठ अंकी कोडसह तात्पुरते शुल्क आकारलेले दिसेल.
  5. पडताळणी पूर्ण करण्यासाठी, payments.google.com वर जा आणि आठ अंकी कोड एंटर करा. 

तुम्ही पेमेंट पद्धतीची पुन्हा पडताळणी करण्याचा प्रयत्न केल्यास:

  1. तुम्हाला कोणत्या कार्डची पडताळणी करायची आहे ते कंफर्म करा.
  2. तुम्ही किती वेळापूर्वी तुमच्या कार्डची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला ते पहा.
    • दोन दिवसांहून कमी कालावधी झाला असल्यास: कमाल दोन दिवस थांबा.
    • दोन दिवसांहून जास्त कालावधी झाला असल्यास: तुमचे कार्ड विवरण तपासा. तुम्हाला आठ अंकी कोडसह Google कडून “GOOGLE चाचणी” म्हणून तात्पुरते शुल्क आकारलेले दिसेल.
कार्ड निकामी केले असून “कार्ड अपात्र आहे” असे नमूद केले आहे

तुम्ही या खरेदीसाठी हे कार्ड वापरू शकत नाही. वेगळे कार्ड वापरून पुन्हा खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

तुम्हाला वापरायचे असलेले कार्ड सूचीबद्ध केलेले नसल्यास, नवीन कार्ड ��ोडण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

तुम्ही दोन सिम कार्ड असलेले डिव्हाइस वापरत असल्यास
पहिल्या स्लॉटमध्ये योग्य सिम कार्ड आहे का ते तपासा आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये असलेले कोणतेही सिम कार्ड काढून टाका.
इतर पेमेंट पद्धती
इतर पेमेंट पद्धतींसाठी, Google Play वर स्वीकारल्या जाणाऱ्या पेमेंट पद्धती यांचा संदर्भ घ्या.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
7273735347119167737
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false