Google Play वरील शोध

शोध ही अशा पायऱ्यांची मालिका आहे, ज्या सर्व पायऱ्या पूर्ण केल्यावर तुम्हाला रिवॉर्ड मिळतात. शोधाच्या तपशील पेजवर आवश्यक पायऱ्यांसह, तुम्ही त्या पूर्ण केल्यावर तुम्हाला मिळणारी रिवॉर्ड यांची सूची असते.

तुम्ही शोधासाठी पात्र ठरता, तेव्हा तो तुमच्या Google Play Points पेजवर दिसतो. तुम्ही शोध पूर्ण करता, तेव्हा तुम्हाला योग्य रिवॉर्ड देण्यासाठी Google Play हे तुमच्या ॲक्टिव्हिटीचा माग ठेवते. अधिक माहितीसाठी, Play Points च्या सेवा अटी आणि Google गोपनीयता धोरण यांवर जा.

टिपा:

  • तुम्हाला मिळतात ते शोध हे, नवीन सदस्य म्हणून तुमचे स्टेटस, तुमची Play Points ची पातळी किंवा इतर वर्तने यांसारख्या गोष्टींवर अवलंबून असतात.
  • वापरकर्त्यांनुसार पायऱ्या बदलू शकतात.
  • शोध पेजवर नमूद केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही निवडलेल्या कोणत्याही क्रमाने पायऱ्या पूर्ण करू शकता.
  • काही शोधांसाठी गेममधील अ‍ॅक्टिव्हिटीचा माग ठेवण्याकरिता तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू करणे आवश्यक आहे. तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी बंद केल्यास, रिवॉर्ड मिळवण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी याबद्दल अधिक जाणून घ्या.
  • काही शोधांसाठी तुम्ही पायऱ्या पूर्ण करण्याकरिता Google Play वापरून साइन इन करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या Play Games प्रोफाइलमध्ये साइन इन न करता गेम खेळल्यास, शोध पूर्ण करण्याच्या आणि रिवॉर्ड मिळवण्याच्या तुमच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. Play Games याबद्दल अधिक जाणून घ्या.
  • कोणत्याही शोध ऑफर किंवा प्रमोशनवर Google Play पॉइंट सेवा अटी लागू होतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

“खरेदी” चा अर्थ काय आहे?

तुम्हाला Play पॉइंट मिळवून देणारा कोणताही व्यवहार हा शोधांमधील “खरेदी” मानला जातो. तुम्ही ॲप किंवा गेम खरेदी करता, सदस्यत्वासंबंधित पेमेंट करता, ॲपमध्ये काहीतरी खरेदी करता अथवा पुस्तक किंवा चित्रपट भाड्याने घेता, तेव्हा हे व्यवहार शोधांसाठी केलेली “खरेदी” म्हणून मोजले जातात. 

टीप: तुम्ही पेमेंट न केल्यास, तुम्हाला विस्तारित चाचण्यांसाठी पॉइंट मिळणार नाहीत.

उदाहरणे

तुम्ही आयटम बदलण्यासाठी पॉइंट वापरता, तेव्हा तुम्हाला कोणतेही नवीन पॉइंट मिळत नाहीत. तुम्ही खरेदी पूर्ण करण्यासाठी पॉइंट वापरता, तेव्हा ती शोध���ंसाठी केलेली खरेदी मानली जात नाही.

तुमच्या गेम किंवा ॲपमध्ये तुम्ही खरेदी करता, तेव्हा तुम्हाला पॉइंट मिळतात. अ‍ॅपमधील खरेदी ही शोधांसाठी केलेली खरेदी म्हणून पात्र ठरते.

तुमचे Play Pass सदस्यत्व तुम्ही रिन्यू करता, तेव्हा तुम्हाला पॉइंट मिळतात. सदस्यत्वाचे हे रिन्यूअल म्हणजे शोधांसाठी केलेली खरेदी मानली जाते.

शोध पूर्ण करण्यापूर्वी मी केलेली खरेदी रद्द केली किंवा तिचा परतावा दिला गेला, तर काय होईल?
  • तुमची खरेदी रद्द केल्यास: तुमचा शोध अपूर्ण आहे, तोपर्यंत तुम्ही दुसरी पात्र खरेदी करू शकता आणि मोहीम पूर्ण करू शकता.
  • शोध पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खरेदीचा परतावा दिला गेल्यास: शोध अपूर्ण स्थितीत परत जातो. तुम्ही शोध तरीही पूर्ण करू शकता.
  • तुम्ही रिवॉर्डवर दावा केला असल्यास, पण तुमच्या शोधाच्या स्टेटसवर परिणाम करणारी खरेदी मागे घेतली असल्यास: तुमचे शोध रिवॉर्डदेखील मागे घेतले जाऊ शकते.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
1166425249463371537
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false