Google Play सोबत स्क्रीन रीडर वापरणे

स्क्रीन रीडर वापरून तुम्ही Google Play मध्ये पुस्तके, मासिके आणि बातमीपर लेख वाचू शकता किंवा संगीत ऐकू शकता.

TalkBack स्क्रीन रीडर वापरून तुम्ही Google Play मध्ये पुस्तके, मासिके आणि बातमीपर लेख वाचू शकता किंवा संगीत ऐकू शकता. TalkBack सुरू करणे कसे करावे ते जाणून घ्या.

टीप: TalkBack हे सर्व फॉरमॅटसाठी उपलब्ध नाही. 

पुस्तके, बातम्या आणि संगीत शोधणे व ऐकणे

पुस्तके शोधणे आणि वाचणे

तुमचे पुस्तक शोधणे

  1. तुम्ही आधीपासून सुरू केले नसल्यास, TalkBack सुरू करणे हे करा.
  2. Play Books Play Books उघडा.
  3. पुस्तक शोधण्यासाठी अ‍ॅप एक्सप्लोर करा:
    • टॅब: तळाशी, तुम्हाला "होम", "खरेदी करा" आणि "लायब्ररी" किंवा "माझी लायब्ररी" यांसारखे टॅब दिसतील. यांपैकी काही टॅबमुळे तुम्ही कदाचित अ‍ॅपमधून बाहेर पडाल.
    • नेव्हिगेशन ड्रॉवर: सर्वात वर���ी डावीकडे, तुम्हाला नेव्हिगेशन ड्रॉवर दिसेल. खरेदी करा, मदत आणि फीडबॅकसेटिंग्ज या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी उघडा.
    • "होम": तुमच्याकडे नसलेले पुस्तक शोधा आणि ते डाउनलोड करा.

पुस्तक वाचणे

  1. तुम्ही आधीपासून सुरू केले नसल्यास, TalkBack सुरू करणे हे करा.
  2. Play Books Play Books उघडा.
    1. तुमच्याकडे आधीपासून पुस्तक असल्यास, ते "लायब्ररी" किंवा "होम" स्क्रीनवर शोधा.
    2. तुमच्याकडे पुस्तक नसल्यास, ते "होम" स्क्रीनच्या सर्वात वरती शोधा त्यानंतर, परिणाम निवडा आणि पुस्तक डाउनलोड करा.
  3. पुस्तक उघडा.
  4. स्क्रीनवर टॅप करा त्यानंतर, चाळून पाहणे या मोडमध्ये प्रवेश करण्यासाठी दोनदा टॅप करा.
  5. आणखी More आणि त��यानंतर मोठ्याने वाचा निवडा.
    • पेजवरील पुढील मजकुरावर जाण्यासाठी, स्‍वाइप करा.
    • पेज फ्लिप करण्यासाठी, दोन बोटांनी डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा.

चित्रपट शोधणे आणि प्ले करणे

चित्रपट नेव्हिगेट करणे

  1. तुम्ही आधीपासून सुरू केले नसल्यास, TalkBack सुरू करणे हे करा.
  2. Play Movies Play Movies उघडा.
  3. होम स्क्रीनवर, स्क्रीन एक्सप्लोर करण्यासाठी स्वाइप करा किंवा स्पर्श करा.
    • तुम्ही स्वाइप करत जाल तसे तुम्ही चित्रपट/बटणांच्या सूचीमधून नेव्हिगेट कराल.
    • चित्रपटांचे तपशील मिळवण्यासाठी, बटणांवर दोनदा टॅप करा.
    • अतिरिक्त कृती (थंब्स अप/डाउन, विशलिस्टमध्ये जोडणे/काढून टाकणे) उघडण्यासाठी दाबून ठेवा.

चित्रपट प्ले करणे

  1. तुम्ही आधीपासून सुरू केले नसल्यास, TalkBack सुरू करणे हे करा.
  2. Play Movies Play Movies उघडा.
  3. तुम्ही खरेदी केलेला चित्रपट प्ले करू शकता किंवा तुमच्यासाठी शिफारस केलेल्या चित्रपटाचा ट्रेलर प्ले करू शकता.
    • चित्रपट प्ले करा: तपशील पेजवर जाण्यासाठी चित्रपटाच्या बटणावर दोनदा टॅप करा. त्यानंतर प्ले करा या बटणावर दोनदा टॅप करा.
    • इतर पर्याय शोधा: Play Movies च्या होम पेजवरील इतर पर्याय पाहण्यासाठी, टॅप करा आणि धरून ठेवा.
बातम्या वाचणे

बातमीपर लेख नेव्हिगेट करणे

  1. तुम्ही आधीपासून सुरू केले नसल्यास, TalkBack सुरू करणे हे करा.
  2. Play Newsstand Play Newsstand उघडा.
  3. तुम्ही होम स्क्रीनवर जाल. तळाशी असलेले टॅब तुम्हाला "तुमच्यासाठी", "लायब्ररी", "एक्सप्लोर करा" आणि "नंतर वाचा" यांसारख्या अ‍ॅपमधील वेगवेगळ्या ठिकाणी नेव्हिगेट करू देतात.
    • नेव्हिगेशन ड्रॉवर: सर्वात वरती डावीकडे.
    • तुमच्यासाठी: तळाशी डावीकडे. या टॅबमध्ये सुचवलेले बातमीपर लेख आहेत.
    • लायब्ररी: तळाशी. या टॅबमध्ये तुमचे स्रोत आणि स्वारस्य असलेले विषय आहेत.
    • एक्सप्लोर करा: तळाशी. या टॅबमध्ये तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये जोडू शकता अशा विषयांची सूची आहे.
    • नंतर वाचा: तळाशी उजवीकडे. या टॅबमध्ये तुम्ही नंतर वाचण्यासाठी सेव्ह केलेले लेख आहेत.

लेख वाचणे

  1. तुम्ही आधीपासून सुरू केले नसल्यास, TalkBack सुरू करणे हे करा.
  2. Play Newsstand Play Newsstand उघडा.
  3. लेख शोधण्यासाठी स्पर्शाने स्वाइप करा किंवा एक्सप्लोर करा त्यानंतर, वाचण्यास सुरुवात करण्यासाठी त्यावर दोनदा टॅप करा
  4. पर्यायी: नंतर वाचण्यासाठी लेख सेव्ह करण्याकरिता, सर्वात वरती उजवीकडे जा आणि नंतर वाचा Add bookmark निवडा.

टिपा आणि युक्त्या

  • नेव्हिगेशन ड्रॉवर आणि टॅब बर्‍याच स्क्रीनवर आहेत जेणेकरून, तुम्ही त्यांचा वापर खूण म्हणून करू शकता.
  • तुम्हाला नेव्हिगेशन ड्रॉवर दिसत नसल्यास, तो दोन बोटांनी उजवीकडे स्वाइप करून उघडा.

 

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
2587398207158822622
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false