अ‍ॅपमधील खरेदीसंबंधित समस्या

काही अ‍ॅप्ससह, तुम्ही अ‍ॅपमध्ये अतिरिक्त आशय किंवा सेवा खरेदी करू शकता. आम्ही यांना "अ‍ॅपमधील खरेदी" म्हणतो. उदाहरणांमध्ये गेममधील एक शक्तिशाली तलवार, अ‍ॅपची अधिक वैशिष्ट्ये अनलॉक करणारी की किंवा खरेदीसाठी वापरलेले व्हर्च्युअल चलन समाविष्ट आहे.

तुमची अ‍ॅपमधील खरेदी दिसत नसल्यास, काम करत नसल्यास किंवा डाउनलोड होत नसल्यास, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • स्वतःहून समस्या ट्रबलशूट करणे.
  • सपोर्टसाठी डेव्हलपरशी संपर्क साधणे.
  • परताव्‍याची विनंती करणे.

तुम्ही अ‍ॅपमधील खरेदी करण्याचा प्रयत्न करत असताना व्यवहार नाकारला गेल्यास किंवा पेमेंटवर प्रक्रिया करता येत नसल्यास, Google Play वर पेमेंटसंबंधित समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणे हे करा.

स्वतःहून समस्या ट्रबलशूट करा

या पायऱ्यांनी तुमच्या समस्येचे निराकरण न झाल्यास, तुमच्या डेव्हलपरशी संपर्क साधा. त्यांच्या अ‍ॅप्ससंबंधित सपोर्ट देणे आणि ती तुमच्यासाठी योग्यप्रकारे काम करत असल्यची खात्री करणे ही डेव्हलपरची जबाबदारी आहे.

तुमची कनेक्टिव्हिटी तपासा

तुमच्याकडे अ‍ॅक्टिव्ह वायफाय किंवा मोबाइल डेटा कनेक्शन असल्याचे तपासा. असे करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे वेबवर शोधणे. Google वर कुत्र्याची पिल्ले शोधण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला कुत्र्याच्या पिल्लांविषयी माहिती दिसल्यास, कदाचित तुमच्या इंटरनेट कनेक्शनसंबंधित समस्या नाही.

शोधाचे परिणाम न मिळाल्यास, कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या असू शकते. तुमच्या कनेक्टिव्हिटी समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा.

सक्तीने थांबवा, त्यानंतर अ‍ॅप किंवा गेम पुन्हा उघडा

तुम्ही खरेदी केलेला ॲपमधील आयटम तुम्हाला मिळाला नसल्यास, तुम्ही वापरत असलेले अ‍ॅप किंवा गेम बंद करण्याचा आणि पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करा.
  1. तुमच्या डिव्हाइसवर, मुख्य Settings अ‍ॅप Settings उघडा.
  2. अ‍ॅप्स किंवा अ‍ॅप्लिकेशन व्यवस्थापित करा (तुमच्या डिव्हाइसवर आधारित हे वेगळे असू शकते) वर टॅप करा.
  3. तुम्ही तुमची अ‍ॅपमधील खरेदी करण्यासाठी वापरलेल्या अ‍ॅपवर टॅप करा.
  4. सक्तीने थांबवा वर टॅप करा.
  5. तुम्ही तुमची अ‍ॅपमधील खरेदी करण्यासाठी वापरलेले अ‍ॅप पुन्हा उघडा.
  6. तुमचा आयट��� डिलिव्हर झाला आहे की नाही ते तपासा.

तुमचे पेमेंट पूर्ण झाले आहे का ते तपासा

तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमची ॲपमधील खरेदी मिळते. तुमचे पेमेंट केले गेले का ते तुम्ही Play Store ॲपमध्ये किंवा Google Play च्या वेब पेजवर तपासू शकता.

Play Store ॲप वापरून पेमेंट तपासा

  1. Google Play Store ॲप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. पेमेंट आणि सदस्यत्वे आणि त्यानंतर बजेट आणि इतिहास वर टॅप करा.

वेब ब्राउझर वापरून पेमेंट तपासा

  1. तुमच्या काँप्युटरवर, तुमच्या Google Play खाते मध्ये जा.
  2. सर्वात वरती, ऑर्��र इतिहास वर क्लिक करा.
  3. तुमची ॲपमधील खरेदी पहा.

डिव्हाइस रीस्टार्ट करा

कधीकधी डिव्हाइस रीस्टार्ट करणे अ‍ॅपमधील खरेदीसंबंधित समस्यांचे निराकरण करण्यात मदत करू शकते. रीस्टार्ट करण्यासाठी:

  1. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर, पॉवर बटण धरून ठेवा.
  2. पॉवर बंद करा किंवा रीस्टार्ट करा (तुमच्या डिव्हाइसवर आधारित हा मजकूर वेगळा असू शकतो) वर टॅप करा.
  3. आवश्यक असल्यास, डिव्हाइस परत सुरू करण्यासाठी पॉवर बटण पुन्हा धरून ठेवा.
  4. डिव्हाइस पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा करा.
  5. अ‍ॅप किंवा गेम पुन्हा उघडा आणि अ‍ॅपमधील खरेदी डिलिव्हर केली गेली आहे की नाही ते तपासा.

Play Store अ‍ॅप अपडेट करा

तुम्ही Play Store ची नवीनतम आवृत्ती रन करता, तेव्हा ॲपमधील खरेदी सर्वोत्तम काम करते. ॲप अपडेट करण्यासाठी:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Play Store ॲप उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर याबद्दल आणि त्यानंतर Play Store ची आवृत्ती वर टॅप करा.
  4. यामुळे ॲप अपडेट होईल किंवा तुमची आवृत्ती अप टू डेट असल्याचे तुम्हाला सूचित केले जाईल.

Android वर Play Store आणि अ‍ॅप्स अपडेट कशी करावी याबद्दल अधिक जाणून घ्या.

तारीख आणि वेळ योग्य असल्याची खात्री करा

तुम्ही अलीकडे तुमच्या डिव्हाइसवरील तारीख आणि वेळ बदलली असल्यास, तारीख आणि वेळ बरोबर असल्याची खात्री करा:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, तुमच्या डिव्हाइसचे Settings ॲप Settings उघडा.
  2. तारीख आणि वेळ वर टॅप करा.
  3. "ऑटोमॅटिक तारीख आणि वेळ" व "ऑटोमॅटिक टाइम झोन" शोधा आणि ते सुरू किंवा बंद केले आहेत हे तपासा. त्यानंतर खालील उपयुक्त पायऱ्या फॉलो करा. 

"ऑटोमॅटिक तारीख आणि वेळ" आणि "ऑटोमॅटिक टाइम झोन" बंद असल्यास

  1. तारीख आणि वेळ व टाइम झोन सेटिंग्ज सुरू करा.
  2. काही मिनिटे थांबा आणि तुमच्या समस्येचे निराकरण झाले का ते तपासा.
  3. न झाल्यास, तुमचे डिव्हाइस रीस्टार्ट करा आणि पुन्हा तपासा.

"ऑटोमॅटिक तारीख आणि वेळ" व "ऑटोमॅटिक टाइम झोन" सुरू असल्यास

  • या दोन्ही सेटिंग्ज सुरू असल्यास, कदाचित तारीख आणि वेळ यासंबंधित समस्या नाही. तुमची कनेक्टिव्हिटी तपासा आणि तुमचे डिव्हाइस रीस्टार्ट करा किंवा इतर ट्रबलशूटिंग पायऱ्या करून पहा.
तुमचा Google Play देश शोधणे

ॲप डेव्हलपरने तुमच्या Google Play देशात ॲप उपलब्ध केले नसल्यास, तुम्ही अ‍ॅपमधील खरेदी करू शकत नाही. तुम्ही नवीन देशामध्ये स्थलांतरित झाल्यास, तुम्ही तुमचा Google Play देश बदलणे हे करू शकता.

सपोर्टसाठी अ‍ॅपच्या डेव्हलपरशी संपर्क साधा

तुम्हाला अजूनही अ‍ॅपमधील खरेदीसंबंधित समस्या येत असल्यास आणि फीडबॅक द्यायचा असल्यास किंवा मदत मिळवायची असल्यास, तुम्ही अ‍ॅपच्या डेव्हलपरशी संपर्क साधू शकता.

अ‍ॅप डेव्हलपर हे करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे:

  • अ‍ॅप किंवा गेमसंबंधित समस्येचे निराकरण करण्यात मदत मिळवा.
  • अ‍ॅप वापरण्याविषयी अधिक जाणून घ्या.
  • तुमच्या खात्यामध्ये अ‍ॅपमधील खरेदी जोडून घ्या.
  • डिलिव्हर न झालेल्या अ‍ॅपमधील खरेदीविषयी विचारा.
  • विशिष्ट अ‍ॅप्ससाठी वापरकर्ता नाव आणि पासवर्ड साइन इनसंबंधित समस्यांविषयी मदत मिळवा.

अ‍ॅप डेव्हलपर संपर्क माहिती शोधा.

परताव्‍याची विनंती करा

तुमच्या खरेदी आणि समस्येच्या तपशिलांच्या आधारावर तुम्हाला ��दाचित परतावा मिळू शकतो. Google Play वर रिटर्न आणि परतावे यांविषयी अधिक माहिती मिळवा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू
9565420707269013926
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false